नागपूर जिल्ह्यातील बेल्‍यामधील कारखान्यात ब्‍लास्‍ट, पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मानस ॲग्रेा इम्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लिमिटेड या वडगाव येथे असलेल्‍या साखर कारखान्‍यात इथेऩॉल करणाऱ्या युनीट एकमध्‍ये आज दुपारी अडिचच्‍या सुमारास टाकीवर गॅस वेल्‍डींग करीत असताना वेल्‍डींगची ठिणगी गॅसमध्‍ये पडली. त्‍यामुळे गॅसचा स्‍फोट होऊन पाच जण ठार झाले.

बेला (नागपूर)  खुर्सापार नजिक असलेल्‍या वडगाव येथे मानस ॲग्रो ॲंड इम्‍फ्रा. लिमीटेड या कारखान्‍यात दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास ब्‍लास्‍ट होऊन पाच जणांचा मृत्‍यू झाल्‍याची ह्रदयद्रावक घटना घडली. स्‍फोटात ठार झालेल्‍यात मंगेश‍प्रभाकर नौकरकर(वय२३), वासुदेव विठ्‌ठल लडी (वय३०), प्रफुल्‍ल पांडुरंग मून (वय२५), सचिन प्रकाश वाघामारे(वय२४), लिलाधर वामन शेंडे (वय ३५) यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - पुरातत्त्व संशोधक डॉ. श्रीपाद चितळे यांचे निधन

सविस्‍तर वृत्‍त असे की मानस ॲग्रेा इम्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लिमिटेड या वडगाव येथे असलेल्‍या साखर कारखान्‍यात इथेऩॉल करणाऱ्या युनीट एकमध्‍ये आज दुपारी अडिचच्‍या सुमारास टाकीवर गॅस वेल्‍डींग करीत असताना वेल्‍डींगची ठिणगी गॅसमध्‍ये पडली. त्‍यामुळे गॅसचा स्‍फोट होऊन पाच जण ठार झाले. नाशिकच्‍या एका खासगी कंपनीकडे येथील वेल्‍डिंगचे काम आहे. पोलिसांना माहिती मिळताच बेला पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. चेंबरवरील मृतदेह काढण्यात आले. गावात वृत्त कळताच जमावाने घटनास्थळी धाव घेतली. कामगारांच्या मृत्यूस प्रशासनास जबाबदार धरून कामगारांचे मृतदेह अजूनही नातेवाईकांनी स्विकारले नसल्याचे कळते. आमदार राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीची मागणी केली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blast in Factory at Bela