esakal | एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Boyfriend abuses air hostess

चतूर असलेल्या मोहितने नीताला आपल्या घरी नेऊन कुटुंबीयांशी ओळख करून दिली. त्यानंतर मोहितने तिला विश्‍वासात घेत तिची आई घरी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याच पैशावर ऐश करण्याची सवय पडलेल्या मोहितने तिला मुंबई, दिल्ली, गोवा आणी अन्य ठिकाणी नेण्यास भाग पाडले.

एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेत असलेल्या युवतीवर प्रियकराने बलात्कार केला. तिचे नग्न फोटो आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन युवतीकडून साडेसात लाख रुपये हडपले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहित दिनकरराव येरपूडे (२४, रा. संघबिल्डिंगजवळ, महाल) व प्रणय दिनकर येरपूडे (२१) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय युवती नीता (बदललेले नाव) ही मानेवाडा रोडवर राहते. तिच्या आईचा कपड्याचा व्यवसाय आहे. सध्या ती एअर हॉस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या वर्गात मोहित येरपूडे हा युवक शिकत होता. नीता ही घरची श्रीमंत असल्यामुळे मोहितने तिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या पैशावर मोहितने आपले शिक्षण पूर्ण केले. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले.

जाणून घ्या - नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग!

चतूर असलेल्या मोहितने नीताला आपल्या घरी नेऊन कुटुंबीयांशी ओळख करून दिली. त्यानंतर मोहितने तिला विश्‍वासात घेत तिची आई घरी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याच पैशावर ऐश करण्याची सवय पडलेल्या मोहितने तिला मुंबई, दिल्ली, गोवा आणी अन्य ठिकाणी नेण्यास भाग पाडले. तेथे नीताशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोहितने तिचे नग्न फोटो आणि अश्‍लील चित्रफित बनवली.

तिला लग्नाचे आमिष दाखवून सेटल होण्यासाठी ज्वेलरीचे दुकान टाकण्यासाठी नीताच्या आईला पैसे मागितले. अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक छळ केला. पैसे न दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्‍यामुळे नीताच्या आईने स्वताचा फ्लॅट विकून मोहित येरपूडेला साडेसात लाख रुपये दिले.

अधिक माहितीसाठी - पोलिसानेच केला घटस्फोटित प्रेयसीवर बलात्कार, मुख्यालयातून अटक

तरीही तो वारंवार पैशाची मागणी करीत होता. त्यानंतर त्याचा भाऊ प्रणय येरपूडे यांनेही तिला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ करून नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली. दोघेही भावांविरूद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे