esakal | सहमतीने ठेवले पती-पत्नीप्रमाणे संबंध; मात्र, कागदपत्रांअभावी अडले लग्न, नंतर घडला हा प्रकार...
sakal

बोलून बातमी शोधा

boyfriend rapes girlfriend in Nagpur

चार महिन्यांपूर्वी आई-वडिलांचे घर सोडून अमितसोबत संसार थाटल्यामुळे तिचे माहेरचे दार बंद झाले होते. त्यामुळे ती माहेरी जाण्यास तयार नव्हती. संतप्त झालेल्या युवतीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा प्रियकराविरुद्ध दाखल केला.

सहमतीने ठेवले पती-पत्नीप्रमाणे संबंध; मात्र, कागदपत्रांअभावी अडले लग्न, नंतर घडला हा प्रकार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वीस वर्षीय तरुणी पदवीधर... तर तरुण जेसीबी ऑपरेटर... एका मैत्रिणीच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली... मौत्रीचे रूपांतर प्रेमात झाले... प्रेमात आकंठ बुडाल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला... मात्र, घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध दर्शवला... मात्र, दोघांनी "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला... तरुणाचे वडिलांशी भांडण झाल्याने तरुणीला घरी जाण्यास सांगितले अन्‌ पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मनोहर पाटील (वय 23, रा. साईबाबानगर, खरबी) हा जेसीबी चालक आहे. 20 वर्षीय युवती ही पदवीधर आहे. दोघेही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. मात्र, ते एकमेकांचे परिचित नव्हते. ऑक्‍टोबर 2019 मध्ये एका मैत्रिणीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्याने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. भेटीगाठी वाढत गेल्याने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

जाणून घ्या - ... आणि शेवटी आज सुटले त्यांचे ग्रहण, संपूर्ण कुटुंबानेच केली कोरोनावर मात

दोघांनीही घरच्यांना लग्न लावून मागितले. मात्र, युवतीच्या घरच्यांनी लग्नास विरोध दर्शवला. यामुळे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून वेगळी खोली करून पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. काही दिवसांनी युवतीने मंदिरात लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, अमित हा कोर्ट मॅरेज करण्याची तयारी करीत होता. यासाठी युवतीला आई-वडिलांच्या घरी असलेले कागदपत्रे आणण्यास सांगितले. युवतीने अनेकदा प्रयत्न केले. परंतु, आई-वडिलांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे लग्न अडले होते. 

काही दिवस झाल्यानंतर अमितने आपल्या आई-वडिलांशी लग्नाबाबत बोलणी केली. मात्र, वडिलांनी लग्न करून देण्यासाठी नकार दिला. तसेच अमित आणि वडिलांमध्ये वाद झाला. त्यामुळे अमितने युवतीला आई-वडिलांच्या घरी परत जाण्यास सांगितले. परंतु, तीन ते चार महिन्यांपूर्वी आई-वडिलांचे घर सोडून अमितसोबत संसार थाटल्यामुळे तिचे माहेरचे दार बंद झाले होते. त्यामुळे ती माहेरी जाण्यास तयार नव्हती. संतप्त झालेल्या युवतीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा प्रियकराविरुद्ध दाखल केला. युवतीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हिणवून लग्नास कळविला नकार

दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना प्रेमसंबंधाबाबत माहिती देऊन लग्न करण्याचा निर्णय कळविला. मात्र, मनपामध्ये नोकरीवर असलेल्या युवतीच्या वडिलांनी लग्नास तीव्र विरोध दर्शविला. अमित हा जेसीबी ड्रायव्हर असल्याचे हिणवून लग्नास नकार कळविला. मात्र, दोघेही लग्न करण्यासाठी ठाम होते. शेवटी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. दोघांनीही "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणे सुरू केले होते.

हेही वाचा - अरे बाप रे! आणखी दोघांना कोरोनाची बाधा

अमितला तीन दिवसांची पोलिस कोठडी

अमितचे वडिलांशी भांडण झाल्यानंतर युवतीला लग्नास दर्शवला. यामुळे चिडलेल्या अमितने युवतीला आपल्या घरी परत जाण्यास सांगितले. मात्र, घरचे दार बंद झाल्याने तिने घरी परत जाण्यास नकार दर्शवला. यामुळे अमित अजून चिडला. रागाच्या भारात त्याने युवतीला मारहाण केली. यानंतर युवतीने आई-वडिलांकडे चर्चा केल्यानंतर घरी परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने अमितवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. वाठोडा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अमितला अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.

go to top