लॉकडाउनमुळे नागपुरातील दोन चित्रपटांच्या निर्मितीला ब्रेक 

राघवेंद्र टोकेकर 
शुक्रवार, 29 मे 2020

काही वर्षांत नागपुरातील चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने "अच्छेदिन' आलेत. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरलेल्या स्थानिक चित्रपट निर्मिती संस्थांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यास प्रारंभ केले. त्यामुळे अनेक आघाडीचे अभिनेते, कलाकार नागपुरात तयार होणाऱ्या चित्रपटांना होकार कळवू लागले. सुमारे पाच महिन्यांपूर्वी नागपुरात प्रारंभ झालेल्या "माता अनसूया' या चित्रपटाच्या निर्मितीला कोरोनाची झळ बसली आहे. 

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे नागपुरातील चित्रपटसृष्टी अडचणीत सापडली आहे. देशात संचारबंदी लागू झाली अन्‌ नागपुरातील दोन चित्रपटांच्या निर्मितीला ब्रेक लागला. यातील एक चित्रपट भालचंद्र फिल्म व व्ही. आर. फिल्म्स प्रस्तुत "व्ही. आर. चिरकुट' असून तर दुसरा मोरे फिल्म्सचा "माता अनसूया' आहे. 

काही वर्षांत नागपुरातील चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने "अच्छेदिन' आलेत. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरलेल्या स्थानिक चित्रपट निर्मिती संस्थांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यास प्रारंभ केले. त्यामुळे अनेक आघाडीचे अभिनेते, कलाकार नागपुरात तयार होणाऱ्या चित्रपटांना होकार कळवू लागले. सुमारे पाच महिन्यांपूर्वी नागपुरात प्रारंभ झालेल्या "माता अनसूया' या चित्रपटाच्या निर्मितीला कोरोनाची झळ बसली आहे. 

आतापर्यंत दीड कोटी खर्च झालेल्या या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मुहूर्त आता लांबणीवर पडला असल्याची माहिती दिग्दर्शक संजीव मोरे यांनी दिली. चित्रीकरण नागपूर, रामटेक, गाणगापूर, पारडसिंगा व शिर्डीत पूर्ण झाले आहे. सध्या प्रॉडक्‍शन सुरू असून, सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट लांबणीवर पडेल असा अंदाज संजीव मोरे यांनी व्यक्‍त केला आहे. 

भालचंद्र कोहाड व राजन सूर्यवंशी निर्मित व विजय गुमगावकर दिग्दर्शित "व्ही. आर. चिरकुट' हा चित्रपट पूर्णत: नागपुरात चित्रित झाला. शहरातील 16 ठिकाणी चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात 70 वृद्ध झळकणार असून, अभिनेते दीपक शिर्के मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाचे दोन गाण्यांचे व एक सीनचे चित्रीकरण रखडले असून, चित्रपट निर्मितीला ब्रेक लागला आहे. सुमारे 65 लाखांचे बजेट असलेल्या या प्रोजेक्‍टचा खर्च आता वाढला असल्याची माहिती गुमगावकर यांनी दिली. 

Video : खासदार पत्नी  आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...

कोणाकडेच नाही उत्तर 

लॉकडाउनचा काळ वाढतच चालल्याने मराठीसह देशातील सर्वच प्रादेशिक चित्रपटसृष्टीचे दिवसागणिक नुकसान होते आहे. चित्रीकरण पुन्हा कधी सुरू होईल?, लॉकडाऊन कधी संपेल?, चित्रपटगृहे सुरू होतील का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे सध्यातरी कोणाकडेच नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A break from the production of two films in Nagpur