कोरोनामुळे कुटुंबीय झाले क्वारंटाइन; घराला कुलूप पाहून अट्टल चोरांनी साधला डाव

file photo
file photo

कामठी (नागपूर) : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज अनेक जणांना लागण होत आहे. अशात एका कुटुंबातील सदस्यांना कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने क्वारंटाइन व्हावे लागले. त्यामुळे घराला कुलूप लागले. या बंद घरावर चोरट्यांची नजर पडली. संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करून मालावर हात साफ केला.

नवीन कामठी पोलिसांनी चोरांकडून ४ लाख ७७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नवीन कामठी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता सुमारास केली. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदासनगर येरखेडा येथील शीतला माता मंदिरासमोर राहणारे सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्टर मोतीलाल कालूराम शिमले यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोनामुळे मेयो रुग्णालयात उपचारासाठी तर मोतीराम शिमले यांना प्रशासनाने २२ जुलैला पाचपवली नागपूर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे राहत्या घरी कुलूप लावले होते. 

अज्ञात चोरांनी बंद घराचे २२ जुलै ते २५ जुलै चे कालावधीत दाराचे कुलूप तोडून कपाटातील २२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २७० ग्रॅम चांदीचे दागिने, लपटॉप, दोन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी २५ जुलैला सायंकाळी सात वाजता सुमारास मोतीलाल शिमले घरी परत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.

नवीन कामठी पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली. कामठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मोहम्मद आरिफ मोहम्मद निजाण (वय २५) रा. मांजरी हस्तिनापूर नागपूर, शेख साजित शेख जलालूद्दीन अन्सारी (वय २५) राहणार चित्तरंजन नगर कामठी, शेख यासिन शेख युसूफ (वय ३४) रा. लुम्बिनीनगर, कामठी, विकास खरबडे (वय ३४) यांना अटक करून त्यांच्याजवळून मोटारसायकल, सोनेचांदीचे दागिने, २ मोबाईल, कॅमेरा व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. 

 (संपादन : मेघराज मेश्राम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com