हवाई माल वाहतूक खर्च कमी झाल्याशिवाय वाहतूक परवडणार नाही : नितीन गडकरी

Nitin_gadkari
Nitin_gadkari

नागपूर : हवाई माल वाहतुकीचा खर्च प्रचंड असून शेतकरी-उद्योजक व व्यापार्‍यांना हा माल वाहतूक खर्च परवडणारा नाही. यासाठी हवाई माल वाहतुकीचा खर्च कमी झाल्यास देशांतर्गत निर्यातीसाठी माल वाहतूक परवडेल असे मत  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


या क्षेत्रात प्रगतीच्या खूप संधी आहेत, त्यावर विचार करून मार्ग शोधता आला पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मासेमारीची अर्थव्यवस्था आता आम्ही 1 लाख कोटीवरून 6 लाख कोटींपर्यंत नेणार आहोत. नागपूरचा संत्रा, जळगावची केळी, बिहारमधील लिची या फळांची वाहतूक देशांतर्गत होऊ शकते. पण माल वाहतुकीचा खर्च कमी केल्याशिवाय शेतकर्‍यांना-व्यापार्‍यांना ही माल वाहतूक परवडत नाही. ना. गडकरी यांनी यावेळी झिंग्यांचे उदाहरण दिले. भारतात झिंगे 700 रुपये किलो आहे. तेच दुबई व अन्य देशात 5 हजार रुपये किलोपर्यंत आहेत. ही माल वाहतूक शक्य झाली तर देशाचे उत्पन्न डॉलरमध्ये वाढेल.


तसेच फळे, भाज्या, फुले आणि मासळी यांची देशांतर्गत हवाई माल वाहतूकही शक्य झाली पाहिजे. प्रवासासाठी योग्य नसलेली अनेक प्रवासी विमाने नुसती पडून आहेत. त्या विमानांमध्ये बदल करून ती विमाने माल वाहतुकीसाठी मिळू शकतात काय, याचा विचार झाला पाहिजे. यासाठी मिळणार्‍या परवानगी आणि प्रक्रिया या त्वरित करता आल्या पाहिजे. यासंबधात गतीशील निर्णय घेता आले पाहिजेत. तरच ते फायदेशीर ठरतील. तसेच या संदर्भात निश्चित असे धोरण आखले गेले पाहिजे. प्रवासासाठी योग्य नसलेली विमाने मालवाहतुकीसाठी वापरयोग्य बनवता येतील काय, यावर अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com