अनिल देशमुख यांच्या बैठकीतून महिला सदस्याला बाहेर काढले अन्‌ प्रकरण पोहोचल अजित पवारांपर्यंत, काय असावा प्रकार...

नीलेश डोये
Sunday, 12 July 2020

संबंधित महिला सदस्य या दुसऱ्या गटातील असल्याचे सांगण्यात येते. तिने जिल्हा परिषेदत मंत्री सुनील केदार गटासोबत जुळवून घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेतील सभापती निवडणुकीच्या वेळेस मोठा "ड्रामा' झाला होता. संबंधित महिला सदस्याने केदार गटाला सहकार्य केल्याची चर्चा आहे.

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषदेतील एका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला सदस्याला बैठकीतून बाहेर काढल्याची घटना चर्चेत आहे. हे प्रकरण प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण घटनेची माहिती त्यांच्याकडून मागविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील रविवारी जिमखाना येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीला जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील सदस्यही उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील सदस्य भेटण्यासाठी कक्षात गेले. यावेळी महिला सदस्याला पाहून ते नाराज झाले.

अधिक वाचा - अबब! बेंबळा धरणात २० किलोची एकच मासोळी...मासेमारी जोमात

संबंधित महिला सदस्य या दुसऱ्या गटातील असल्याचे सांगण्यात येते. तिने जिल्हा परिषेदत मंत्री सुनील केदार गटासोबत जुळवून घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेतील सभापती निवडणुकीच्या वेळेस मोठा "ड्रामा' झाला होता. संबंधित महिला सदस्याने केदार गटाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशमुख गटाला सभापतिपद मिळाले नाही. यामुळे देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. 

प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा

बैठकीत महिला सदस्यांना पाहून चांगलेच संतापले. त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. यामुळे महिला सदस्यही नाराज झाल्या. त्यांनी थेट घर गाठले. या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. काहींनी गृहमंत्री तर काहींनी महिला सदस्याची बाजू उचलून धरली. हे प्रकरण प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The case of that female members reached Ajit Pawar