esakal | राज्य सरकारकडून माध्यमांची गळचेपी, चंद्रकांत पाटलांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil criticized mahavikas aghadi government on arnab goswami arrest case

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी हा आरोप केला होता. अर्णव गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचप्रकरणात आज अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरच आज चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. 

राज्य सरकारकडून माध्यमांची गळचेपी, चंद्रकांत पाटलांचा आरोप

sakal_logo
By
संजय डाफ

नागपूर - अर्णब गोस्वामीने वेगवेगळ्या मुद्द्यावर आवाज उठवला. मात्र, आज त्यालाच अटक करण्यात आली. राज्य सरकार अर्णबचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला. ते मंगळवारपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला.

हेही वाचा -Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मे 2018 रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते. सुसाईड नोटमध्ये पत्रकार गोस्वामी यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.  अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी हा आरोप केला होता. अर्णव गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचप्रकरणात आज अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरच आज चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. 

पाटील म्हणाले, माध्यमांच्या प्रतिनिधीला अटक होणे हे लोकशाहीच्या दृष्टीकोणातून वाईट आहे. ही माध्ममांची गळचेपी आहे. अर्णब गोस्वामीला गुन्हेगारासारखे खेचत नेले. त्यासाठी भाजप राज्यभर निदर्शने करणार आहे. आज चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात नागपुरात देखील निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच इंदिरा गांधींनीही माध्यमांची गळचेपी केली होती. त्यामुळेच त्यांना जनतेने पराभूत केले होते, असा आरोपही पाटलांनी यावेळी केला.

go to top