Good News : नागरिकांना मिळणार मोफत ‘इम्युनिटी पॉवर डोज’; जिल्हा परिषदेची मंजुरी

Citizens will get free immunity power dose
Citizens will get free immunity power dose

नागपूर : चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत जि.प.ला मिळालेल्या निधीवर एक कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज मिळाले. या निधीतून ग्रामीण भागातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने होमियोपॅथिक आरसेनिक एल्बम ३० या औषधीचे वितरण करण्यासाठी ८० लाखांचा खर्च करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. विरोधकांच्या बहिष्कारानंतर तांत्रिक अडचणी वगळता सुरळीत पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत १९ हजार ६५९ रुग्ण आढळून आल्याचे सांगत १७ हजार २३९ रुग्ण बरे झाल्याची माहिती सभागृहाला दिली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२० असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या ग्रामीण भागात १८७१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, मृत रुग्णांची संख्या ५४९ असल्याचे सांगितले.

कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचार सुरू असल्याचे सांगत निरंतर सर्व्हे सुरू आहे. जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा गत महिनाभरापासून सर्व्हे सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. येत्या आठवड्याभरात सर्व्हे पूर्ण करून शेतकऱ्यांना २५ हजार मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

काही तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन बोगस सर्व्हे करीत असल्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच पालकमंत्री पांदण रस्त्यांची कामे जि.प.मार्फत करण्याचा प्रस्ताव मांडला. व्यासपीठावर उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, वित्त व शिक्षण सभापती भारती पाटील, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रमिला जाखलेकर उपस्थित होत्या.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com