नाही म्हणता म्हणता तुकाराम मुंढे सभागृहात आले; महाभारताचे संकेत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

सतरंजीपुरा येथील विलिकरणासाठी थोडा वेळ देण्याची मागणी करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाविरोधात त्यांनी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात पत्रकार परिषदत घेतली होती. अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न केले होते.

नागपूर : महापालिका आयुक्त तुकराम मुंढे सभेला येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज त्यांनी उपस्थित राहून नगरसेवकांसह सर्वांनाच धक्का दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या सभेतून मुंढे निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मुंढे सभेत आल्याने ते काय भूमिका घेतात, सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रश्‍नांना काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विशेष म्हणजे सोमवारी महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. स्मार्ट सिटीच्या निधीचे नियमबाह्य वाटप केले तसेच मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचा आरोपही महापौरांनी केला होता. नगरसेवकांचे फोन उचलत नाही, अपमानास्पद वागणूक देतात अशा तक्रारी मुंढे यांच्या विरोधात आहेत. मुंढे आले तेव्हापासूनच त्यांचा सत्ताधाऱ्यांसोबत वाद सुरू होता. मात्र विरोधकांनाही त्यांनी सोडले नाही. करोनाच्या काळात लॉकडाऊन करण्यावरून त्यांच्या आणि आमदार विकास ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती.

हेही वाचा - हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत

सतरंजीपुरा येथील विलिकरणासाठी थोडा वेळ देण्याची मागणी करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाविरोधात त्यांनी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात पत्रकार परिषदत घेतली होती. अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न केले होते. नुकत्याच झालेल्या सभेसाठी मुंढे यांनी करोनाचे कारण पुढे करून परवानगी नाकारली होती.

राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र राज्य सरकारने सभा घेण्यास मंजुरी दिल्याने आयुक्तांचा नाईलाज झाला. मात्र त्यांचा राग कायम होता. तुम्ही सभा बोलावली तर व्यवस्थाही तुम्हीच करा असे विधान त्यांनी केले होते. सभा सुरू झाल्यानंतर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तरे देण्याऐवजी ते नाराज होऊन निघून गेले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner Tukaram Mundhe attends the NMC meeting