त्या’ आदर्श शिक्षकाच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार

file photo
file photo

नागपूर : जिल्हा परिषदेची आदर्श शिक्षक पुरस्‍काराची निवड वादात सापडली आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची तक्रार विभागीय आयुक्त, सीईओ यांच्याकडे करण्यात आली आहे. तक्रार आल्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा सभापती भारती पाटील यांनी दिला होता. त्यामुळे आता ते कोणती कारवाई करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून पाटील यांचीच कसोटी पणाला लागल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.

आदर्श पुरस्कारसाठी शिक्षकाची निवड करताना काही निकष आहेत. यात गैरव्यवहाराचे आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे आहे. परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्करासाठी जिल्हा परिषदने निवड केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला. काही पात्र शिक्षकांना डावलल्याचीही ओरड होत असल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले.

शिक्षण सभापती पाटील यांनी कोणत्याप्रकारची नियमबाह्य निवड झाला नसल्याचा दावा केला होता. या निवडीवर आता आक्षेप घेण्यात आला आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची तक्रार राजेंद्र सतई यांनी विभागीय आयुक्त, सीईओ आणि शिक्षण सभापती भारती पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या निवडीवर अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून पात्र शिक्षकांना डावल्याची ओरड होत आहे. निवड करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com