महापौर संदीप जोशी म्हणाले, सिमेंट रोडचे अर्धवट कामे पूर्ण करा; नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय

राजेश चरपे
Thursday, 8 October 2020

प्रारंभी जोशी यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या सिमेंट रोडच्या स्थितीचा आढावा घेतला. अनेक झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे असलेल्या अपुऱ्या माहितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यादृष्टीने येत्या १३ ऑक्टोबर रोजी शहरातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत आयुक्तांसह बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

नागपूर : शहरातील सिमेंट रोडचे अनेक भागात काम बंद आहेत तर काही भागांमध्ये अर्धवट काम राहिलेले आहे. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. यासंबंधी तातडीने दखल घेऊन संबंधितांनी सिमेंट रोड संदर्भातील प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

शहरातील सिमेंट रोड संदर्भात बुधवारी (ता. ७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, धनंजय मेंढुलकर, गुरूबक्षानी आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

प्रारंभी जोशी यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या सिमेंट रोडच्या स्थितीचा आढावा घेतला. अनेक झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे असलेल्या अपुऱ्या माहितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यादृष्टीने येत्या १३ ऑक्टोबर रोजी शहरातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत आयुक्तांसह बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

नागपूरला ‘स्मार्ट’ करण्यासाठी सर्वांची गरज

नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने स्टेक होर्ल्डस मीटचे श्रुखंले अंतर्गत शहरातील इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर कॉलेजचे प्रतिनिधीची सभा बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे उपस्थित होते. महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने स्टेक होर्ल्डसची बैठक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी मोरोणे यांनी उपस्थित प्रतिनिधीसमोर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

शहराचा विकास करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी सोबत येऊन सहकार्य करण्याची गरज आहे. नागपूर शहराला ‘लाईव्हली’, ‘सेफ’, ‘सस्टेनेबल’ व ‘हेल्दी’ शहर करण्याच्या दृष्टीने भरघोस मदत करण्याचे आवाहन स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांनी केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete partial work of cement road