esakal | महापालिकेमुळेच कोरोना बोकाळला; विकास ठाकरेंची केंद्रीय पथकाकडे तक्रार

बोलून बातमी शोधा

Corona increase due to the municipality Vikas Thakares complaint to the Central Squad

केवळ लसीकरण आणि कोरोनाचे आकडे प्रकाशित करणे एवढेच आपले काम असे असा समज मनपाने करून घेतला आहे. शेकडो नवे बेड महापालिकेच्या रुग्णालयात पडून आहेत. सर्व जबाबदारी मेयो आणि मेडिकलवर टाकली.

महापालिकेमुळेच कोरोना बोकाळला; विकास ठाकरेंची केंद्रीय पथकाकडे तक्रार
sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शहरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. मनुष्यबळ आणि सर्व सुविधा उपलब्ध असताना फक्त कागदी घोडे नाचवल्या जात असल्याने आज कोरोनाचा उद्रेक झाल्याचा आरोप शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय पाहणी पथकाची आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आमदार अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री आदींनी भेट घेतली. महापालिकेने सुरुवातीपासूनच कोरोनाला गंभीर घेतले नाही. आज मनपाच्या एकाही इस्पितळा कोरोना रुग्णांवर उपचार होत नाही. तशी सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

अधिक वाचा - ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही’ हा भ्रम चुकीचा; पोस्टकोविड परिणामांची वेळीच काळजी घ्या 

केवळ लसीकरण आणि कोरोनाचे आकडे प्रकाशित करणे एवढेच आपले काम असे असा समज मनपाने करून घेतला आहे. शेकडो नवे बेड महापालिकेच्या रुग्णालयात पडून आहेत. सर्व जबाबदारी मेयो आणि मेडिकलवर टाकली. आज खासगी आणि सरकारी रुग्णालयातही ऑक्सिजन बेड रुग्णालय मिळत नसल्याचे विकास ठाकरे यांनी केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिले.

महापालिकेचे ३९ सेंटर बंद पडले

लसीचा पुरेसा साठा नसल्याने एक दोन दिवसातच लसीकरण संपणार आहे. टेस्टिंग कीडचे सॅम्पल नसल्यामुळे महापालिकेचे ३९ सेंटर बंद पडलेले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना आठ ते दाह दिवस वाट बघावी लागले. यासाठी केंद्र सरकारने त्वरित लसीकरणाचा पुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे विकास ठाकरे यांनी यांनी केंद्रीय पथकाला सांगितले.