नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान ; एकाच दिवशी 4 मृत्यू तर 222 नवे रुग्ण

file photo
file photo

नागपूरः  कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत शुक्रवार काळा दिवस ठरला. उपचारादरम्यान चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून शहरातील 151 तर ग्रामीणमधील 71, अशा 222 जणांना कोरोनाचा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात एका दिवशी नोंद झालेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याने विक्रम केला. जिल्ह्यात आतापर्यंत 3687 जणांना कोरोनाबाधित झाले असून यातील 898 ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत असल्याचे अधोरेखित झाले. दरम्यान, आज 94 नागरिक कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत शहरातील कोरोनाबळींची संख्या 69 वर पोहोचली.

शहरात कोरोनाने घट्ट पाय पसरण्यास सुरुवात केल्याने प्रशासनातही खळबळ माजली असून रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन रॅपिड टेस्टमधून 45 जणांना तर एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या घशातील स्त्राव नमुन्यातून 40 जण कोरोनग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले.

खासगी लॅबमधून 37, मेयोतून 35, माफ्सूतून 27, मेडिकलमधून 25, "नीरी'तून 13 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. कोरोनामुळे दगावलेल्या चौघांपैकी एक झिंगाबाई टाकळी येथील 46 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्याच्यावर मेडिकलच्या कोव्हिड रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. कोरोनाचे बळी ठरलेल्या आणखी दोघांची नोंद मेयोत झाली. त्यापैकी एका 35 वर्षीय तरुणाला डोक्‍याला मार लागल्यानंतर अत्यवस्थ स्थितीत तपासणीसाठी आणले गेले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचे निधन झाले.

रस्ता अपघातात हा तरुण जखमी झाला होता. तर दगावलेला तिसरा 62 वर्षीय कोरोना बाधित हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा रहिवासी होता. तर चौथ्या कोरोनाबाधितावर जिल्ह्याबाहेर उपचार सुरू होते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये करोनाची बाधा झालेल्या 1310 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक 369 रुग्णांवर आमदार निवासमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तर 360 जणांवर मेयोत आणि 264 जणांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे.

जरिपटक्‍यात आणखी 9 जणांना बाधा

नव्याने कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये जरीपटकातील 9, शांतीनगरातील 6, जगनाडे चौकातील 5, दिघोरीतले टेलीफोन नगर, वर्धमाननगरातील प्रत्येकी 4, अनंतनगरातील एसबीआय कॉलनी, बिनाकी मंगळवारीतील प्रत्येकी 2 दोघांना कोरोनाची बाधा झाली.

म्हाळगीनगर, भरतनगरातही बाधित

चंद्रलोक बिल्डींग सेंट्रल एव्हेन्यू, सेव्हन स्टार हॉस्पिटल, टेका नाका येथील सिद्धार्थनगर, वैष्णो देवीनगर, हिस्लॉप कॉलेज चौकातील आयएससीबी कॉलनी, हनुमाननगर, हिंदूस्थाननगर, आझाद कॉलनी, रविंद्रनगर, तांडापेठ, काटोल मार्गावरील साई बाबा आटा चक्की, वैशालीनगर, भगवाननगर, रामनगरातील लक्षमी कल्याण अपार्टमेंट, निकाल मंदिर परिसर, मोहाडीनगर, डिप्टी सिग्नल पाजासर चौक, भरतनगर, आंबेडकर चौक, धंतोलीतील नळहरी अपार्टमेंट, इतवारीतील सुदाम रोड, राणी दुर्गावती चौक, नवीन शुक्रवारी, छाप्रू नगरातील रामकृष्ण अपार्टमेंट, मस्कासाथ, अवस्थीनगर, म्हाळगीनगरात प्रत्येकी एक नवा कोरोनाबाधित आढळला.

कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी 62.57

शुक्रवारी 94 बाधित कोरोनामुक्त झाले. यापैकी 76 ग्रामीणमधून तर 18 शहरातून कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2307 वर गेली. कोरोना मुक्तीची ही टक्‍केवारी पुन्हा 62.57 वर घसरली.

संपादन- अनिल यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com