esakal | कोरोनाची परिस्थिती चिंताजनक; दिवसभरात ६९ कोरोनाबळी, ५ हजार ६६१ बाधित

बोलून बातमी शोधा

Dilapidated situation in Nagpur Municipal Zone

सोमवारी ३ हजार २४७ जण ठणठणीत होऊन घरीही परतलेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख २० हजार ५६० वर पोहचली आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून ७७.६० टक्क्यांवर आले आहे. 

कोरोनाची परिस्थिती चिंताजनक; दिवसभरात ६९ कोरोनाबळी, ५ हजार ६६१ बाधित
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : वेगाने कोरोना विषाणूचा विळखा करकचून आवळला जात आहे. वेगाने सुरू असलेल्या प्रादुर्भावाच्या साखळीत कालच्या तुलनेत २ हजाराने घट झाली. रविवारी ७ हजारांवर बाधितांची संख्या होती. तर सोमवारी जिल्ह्यात ५ हजार ६६१ नव्या बाधितांची भर पडली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे होणारे मृत्यूने जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ६९ बाधितांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८४ हजार २१७ झाली आहे. तर कोरोनाबळींची संख्या ५ हजार ८३८ पर्यंत धडकली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३ हजार २४७  बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ५७ हजार ८१९ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ३६ हजार ५३६ रुग्ण शहरातील आहेत. तर २१ हजार २८३ कोरोनाबाधित ग्रामीण भागातील आहेत. तर आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्येही ग्रामीण भागातील १७४४ तर शहरी भागातील३ हजार ९१२ बाधितांचा समावेश आहे. रोनाचा विळखा पडून उपचारादरम्यान सोमवारी दगावलेल्या ६९ जणांपैकी शहरातील ३७ तर ग्रामीण भागातील २७ मृत्यू आहेत. ५ जण  जिल्ह्याबाहेरील आहेत.

अधिक वाचा - ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही’ हा भ्रम चुकीचा; पोस्टकोविड परिणामांची वेळीच काळजी घ्या 

आज रुग्णसंख्येत काहीशी घट असली तरी ही चाचण्यांच्या तुलनेत अधिकच आहे. सोमवारी शहरात ११,४९४ तर ग्रामीणमध्ये ५५५३ अशा एकूण १७ हजार ४७ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी तब्बल ३३.२१ टक्के म्हणजेच ५ हजार ६६१ जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. सोमवारी ३ हजार २४७ जण ठणठणीत होऊन घरीही परतलेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख २० हजार ५६० वर पोहचली आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून ७७.६० टक्क्यांवर आले आहे. 

जिल्ह्यात ५७ हजार कोरोनाबाधित

जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढण्यासोबतच सक्रिय रुग्णांच्याही संख्येने उच्चांकी गाठली आहे. आज घडिला जिल्ह्यात तब्बल ५७ हजार ८१९ इतके सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. परंतु यातील ७७.६२ टक्के म्हणजेच ४४ हजार ८७९ रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्य व तीव्र अशी लक्षणे असलेले १२ हजार ९४० रुग्ण आहेत. यातील ५ हजार २८९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.