सूरताल झाले बेताल, जादू झाली छूमंतर, कलेला लागली कोरोनाची नजर

अशोक डहाके
Tuesday, 6 October 2020

सावनेर तालुक्यात शेकडो कलावंत ऑर्केष्ट्रा, सुगमसंगीत, धार्मिक कार्यकमांसह विवाह समारंभ तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात गायन तसेच मिमीक्रीच्या माध्यमातून हास्य फुलविणाऱ्या कलावंताना मागील सहा महिन्यांपासून हाताला काम नसल्याने स्वतःला व कुटुबांला जगवायचे कसे, याच चिंतेत पडले आहेत.

केळवद (जि.नागपूर) : मागील सहा महिन्यांपासून कोरोनासारख्या संसर्गामुळे गर्दी टाळण्यासाठी शासनाने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह लग्न सोहळे, तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द केल्याने याशी निगडीत असणाऱ्‍या कलावंताना आता उपासमारीची वेळ आली. आम्ही जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न कलावंतापुढे निर्माण झाला आहे.

अधिक वाचाः नरखेड, काटोलच्या  संत्र्यांचा गोडवा अधिक वाढणार, विक्रीसाठी जाणार देश-विदेशात
 

आता दुर्गोत्सव जाणार खाली
सावनेर तालुक्यात शेकडो कलावंत ऑर्केष्ट्रा, सुगमसंगीत, धार्मिक कार्यकमांसह विवाह समारंभ तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात गायन तसेच मिमीक्रीच्या माध्यमातून हास्य फुलविणाऱ्या कलावंताना मागील सहा महिन्यांपासून हाताला काम नसल्याने स्वतःला व कुटुबांला जगवायचे कसे, याच चिंतेत पडले आहेत. कोरोनामुळे यावर्षी लग्नसोहळ्यात सादर होणारे सुगमसंगीत, ऑर्केष्ट्रा यासह विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक जत्रा तसेच गणेशोत्सव यात या कलावंताना कला सादर करताच आली नाही, तर येणारा दुर्गोत्सव यावर्षी शासनाच्या कठोर नियमावलीमुळे होणार नसल्याने यातून वर्षभराची कमाई करणाऱ्या कलावंतापुढे कामच नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पार्श्वगायक, गायक, वादक, कार्यक्रमाचे सांऊड इंजीनीअर, लाईटमॅन, कॅमेरामॅन, विडीओग्राफर, स्टेज संचालक, मिमीक्री आर्टिस्ट, याक्षेत्राशी जुळलेले कामगार या सर्वांना मागील सहा महिन्यांपासून काम नसल्याने ते हलाखीचे जिवन जगत आहेत. अशातच या कलावंतानी शासनाने आम्हाला नियम अटी शिथीलता आणून आमचे कार्यक्रम सुरु होईल असे पाऊले उचलावे, अन्यथा आम्हा कलावंताना शासनाने आर्थिक मदत देवून आमचे पुर्नवसन करावे, अशी मागणी तालुक्यातील उपेक्षित कलावतांनी केली आहे.

अधिक वाचाः शेतकरी म्हणतात, अरे कुठे नेऊन ठेवले भाऊ पांदण रस्ते?
 

आर्थिक पॅकेज घोषित करुन मदत करावी
मी मागील पंचवीस वर्षांपासून ऑक्रेस्ट्रा, सुगमसंगीत गायन, वादन करीत आहे. मागील वीस वर्षांपासून जादूचे खेळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात मोठ्या प्रमाणात सादर करीत लोकांचे मनोरंजन केलेले आहे. कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून एकही ऑॅर्डर नसल्याने यावर्षी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हीच स्थिती या क्षेत्राशी जुळले असणाऱ्या सर्वच कलावंताची असल्याने शासनाने आम्हा कलावंताना आर्थिक पॅकेज घोषित करुन मदत करावी.
किशोर दगडे
गायक, वादक, तसेच जादूगार कलावंत,
केळवद

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's eye was on the art scene, work stopped for six months