नागपुरातील नागरिकांना दिलासा, उघडणार ही दुकाने

mobile.
mobile.

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज शहरात 31 मेपर्यंत शिथिलतेसह लॉकडाउनचा कालावधी वाढविला. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला कॉटन मार्केट भाजीबाजार मंगळवारपासून अटीसह सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले. एवढेच नव्हे तर उद्या, सोमवारपासून आठवड्यातून तीन दिवस मोबाईल, संगणक दुरुस्तीची दुकाने तसेच होम अप्लाएन्सेसची दुकाने सुरू राहतील.


घाऊक भाजीविक्रीसाठी येत्या 19 मेपासून कॉटन मार्केट भाजीबाजार सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी काढले. पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहनांना कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहील. विशेष म्हणजे नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी येथे बंदी आहे. कॉटन मार्केट मध्यवर्ती ठिकाणी असून येथे व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या व सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने हे मार्केट 26 मार्चपासून बंद होते. सद्य:स्थितीत लॉकडाउन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत घाऊक विक्रीला 19 मेपासून सुरू करण्याची परवानगी आयुक्तांनी दिली. या मार्केटमधील इतर जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजतापर्यंत सुरू राहतील. याशिवाय आयुक्तांनी आज लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात आदेश काढले.

आयुक्तांनी 31 मेपर्यंत लॉकडाउन वाढविला. यात प्रतिबंधित क्षेत्रात जीवनाश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील. इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील इतर भागात जीवनावश्‍यक वस्तूंसह होजियरी कपडे, कुलरची दुकाने, हार्डवेअरची दुकाने सुरू राहतील. आयुक्तांनी आज मोबाईल, संगणक दुरुस्तीची दुकाने तसेच होम अप्लाएन्सेसची दुकाने उद्या, सोमवारपासून सुरू करण्यासाठीही परवानगी दिली. त्यामुळे या व्यावसायिकांसोबतच मोबाईलमध्ये बिघाड झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. मात्र, आठवड्यातून तीन दिवस ही दुकाने सुरू राहतील.

मोबाईल, संगणक दुकानांसाठी दिवस निश्‍चित
आयुक्त तुकाराम मुंढे मोबाईल, संगणक दुरुस्ती तसेच होम अप्लाएन्सेसची दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार याच दिवशी सुरू राहील, असे आदेशात नमूद केले. या दिवशी कुलरसह इलेक्‍ट्रिक साहित्य, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअरचीही दुकाने सुरू राहण्याचे आदेश यापूर्वीच आयुक्तांनी काढले. वाहनांचे सुटे भाग, वाहन दुरुस्ती, स्टेशनरी, कपड्यांची दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवारी सुरू राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com