criminals fired out house of woman who filed FIR against Munna yadav
criminals fired out house of woman who filed FIR against Munna yadav

धक्कादायक! मुन्ना यादवविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलेचे जाळले घर; पीडितेच्या आईस ठार मारण्याचा प्रयत्न

Published on

नागपूर ः राज्य कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव व कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू तोतवानी यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देणाऱ्या महिलेचे घर गुंडांनी पेटवून दिले. महिलेच्या आईला मारहाण करीत प्लॉटची कागदपत्रे चोरून नेली. सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित महिला इंद्रप्रस्थनगरात आईसह राहते. त्या महिलेने काही दिवसांपूर्वीच प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या वादातून मुन्ना यादव, पंजू तोतनानी यांच्यासह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एमआयडीसी पोलिसांनी मुन्ना यादव आणि पंजू तोतवानीवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हासुद्धा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार आहेत. 

त्यानंतर पीडितेवर तक्रार परत घेण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप आहे. ३ मार्चला अज्ञात आरोपींनी महिलेच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. तर, शनिवारी गुंड दुर्गेश पसेरकर आणि त्याच्या टोळीने महिलेच्या आईच्या घराला आग लावली. त्यांच्या ७० वर्षीय आईला मारहाण करून आगीत लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारी धावून आल्याने वृद्धा वाचल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी महिलेकडील काही दस्तऐवज जाळले, तर काही दस्तऐवज चोरून नेल्याचा आरोप आहे. पोलिस उपायुक्त नुरुल हसन व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पीडित महिलेने माझ्या कुटुंबीयास धोका असल्याचे सांगून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com