बापरे! दंड भरून करताहेत लग्न, आता नियमांचा भंग केल्यास थेट मंगल कार्यालयच होणार सील

cultural hall will sealed if violate corona rules in nagpur
cultural hall will sealed if violate corona rules in nagpur

नागपूर : अनेकजण दंड भरून लग्न समारंभ उरकत असल्याचे आढळून आल्याने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नियम पायदळी तुडविणारे मंगल कार्यालयांना सील ठोकण्याचे निर्देश दिले. दरम्यान, आज महापालिकेने १४ मंगल कार्यालयांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख २३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

कोरोना वाढत असून मंगल कार्यालयांना ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतु, आधीच लग्नाची तारीख ठरली असल्याने अनेकजण दंडाची तयारी ठेऊन समारंभ उरकत आहे. एवढेच नव्हे दोनशे लोक समारंभात उपस्थित राहत आहेत. काहींनी दंड भरण्याचीही तयारी ठेवली. परंतु, आता आयुक्तांनी कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालये सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मंगल कार्यालय, लॉन संचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. दरम्यान आज महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने १४ मंगल कार्यालये, लॉनवर कारवाई करून१ लाख २३ हजारांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली. 

बुकिंगचे पैसे परत मिळवून द्या : महापौर 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभ मंगल कार्यालय, लॉनमध्ये आयोजित करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहे. या सोहळ्यासाठी नागरिकांनी अ‌ॅडव्हान्स देऊन बुकिंग केली आहे. बुकिंगची रक्कम मंगल कार्यालय, लॉन मालकांकडून परत मिळेल, याची व्यवस्था करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले. नागरिकांनी लग्न पुढे ढकलले, परंतु पैसे परत मिळतील की नाही, याबाबत ते काळजीत आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com