नागपूर जिल्ह्यातील "या' तालुक्‍यात होतात दररोजचे मृत्यू, कसे ते वाचा...

file
file

कामठी (जि.नागपूर) : कामठी तालुक्‍यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूने आतापर्यंत चौथे शतक पार केले असून मागील बारा दिवसांपासून सतत एकामागे एक बारा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र वाढतच आहे. मागील एक आठवड्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा 26 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

अधिक वाचा : बापरे! भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावे शंभर कोटींचे कर्ज? ठगबाजांचा अखेर असा भरला घडा...

दरदिवसाला वाढतोय आकडा
तुमडीपूरा येथील एका 60 वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू मेयो रुग्णालयात मृत्यू झाल्याने शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. दर दिवसाला मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधीत रुग्णांच्या मृत्युमुळे नागरिकांच्या मनात विविध चर्चांना उधाण आले आहे. आजपावेतो तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 419 वर पोहोचली आहे. त्यातील182 रुग्णांनी कोरोनावर मात केली. बारा रुग्ण दगावले असून226 रुग्ण ऍक्‍टिव आहेत.

पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह
आज मिळालेल्या सव्विस रुग्णांमध्ये शहरातील पंधरा तर ग्रामीण भागातील अकरा रुग्ण आहेत. यात रनाळा व येरखेडा येथील प्रत्येकी पाच व खैरी येथील एका रुग्णांचा समावेश आहे. शहरात मिळालेल्या रुग्णामध्ये इमलीबाग, दाल ओली नं.1, दाल ओली नं.2, वारीस पुरा, हमालपुरा, नया बाजार येथील प्रत्येकी दोन तर कुंभारे कॉलनी, भोई लाईन, भाजीमंडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. काल नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पोलिस स्टेशनच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. दोन्ही पोलिस स्टेशनच्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली. आज मृत्यू झालेल्या शहरातील तुमडीपुरा येथील पॉझिटिव्ह महिलेचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मेयो शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज सकाळी मृत्यू झाला. आज पॉझिटिव्ह मिळालेल्या या सर्व रुग्णांना उपचारार्थ नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच त्यांचे निवासस्थान असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला.

अधिक वाचा : सावध व्हा, भांडणात मध्यस्थी करणे भोवले, थोडक्‍यात वाचला जीव, काय झाला प्रकार...

हलगर्जी केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप
सैनिक छावणी परिसरातील गोरा बाजार येथील52वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता.25) घरीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला जवाबदार असल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. गोराबाजार येथील मृत ओटीएसमध्ये टेलरिंगचे काम करत होता. त्याला ताप असल्याने त्याने खासगी डॉक्‍टरकडे जाऊन तीन दिवसांची औषधी घेतली. मात्र त्या औषधाने ताप न गेल्याने परत डॉक्‍टरकडे गेला. मात्र खाजगी डॉक्‍टरांनी त्याला कोविड तपासणी करण्याचा सल्ला दिला. 23 तारखेला त्या व्यक्तीने जयस्तंभ चौकातील तपासणी केंद्रावर जाऊन रेपीड अँटीजन टेस्ट करून घेतली व घरी निघून गेला.24 तारखेला दुपारी बाराच्या दरम्यान त्याचा अहवाल छावणी परिषदेच्या आरोग्य विभागाला आला. परंतू मृताच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे मोबाईल न लागल्याने त्यांना यांची सूचना मिळू शकली नाही. सायंकाळी पाच वाजता त्या वार्डाचे नागरसेवक यांच्याकडून सूचना मिळाली की अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ही सूचना मिळताच घरच्या लोकांनी त्यांना नागपूरला नेण्याकरिता वाट बघितली. मात्र कुणीही न आल्याने शेवटी या रुग्णाचे घरीच राहिल्याने मृत्यू झाला. शव घरातच राहून गेले. अखेर रात्री नऊच्या दरम्यान चार ते पाच लोकांच्या उपस्थित प्रशासनाच्या वतीने अंतिम संस्कार करण्यात आले. मृताच्या पत्नी व दोन मुलींना मेयो येथे नेऊन कोरोंटाईन करण्यात आले. मेयो हॉस्पिटलला त्याची कोविड 19 ची तपासणी करण्यात आली. मात्र त्यात दोघे निघेटिव्ह तर एक मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृताच्या नातेवाईकांची प्रशासनाने हलगर्जी केल्याचा आरोप करीत मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. याची तक्रार जुनी कामठी पोलिस ठाण्यात करण्यात आली.


संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com