esakal | तणनाशकाने फस्त केले भुईमूग पीक! काय झाले असे... 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बीएएसएफ कंपनीचे ओडिसी हे भुईमुगावर लेबल क्‍लेम असलेले औषध आहे. त्यामुळे पीक कसे नष्ट झाले, हा प्रश्‍न आहे. यामुळे तरुण शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. 

तणनाशकाने फस्त केले भुईमूग पीक! काय झाले असे... 

sakal_logo
By
योगेश गिरडकर

सावरगाव (नागपूर) : मोहगाव (भ.) येथील युवा शेतकऱ्याने कळमेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्याकडील शेती ठेकापत्र करून पेरली. भुईमुगाचे पीक चांगले बहरले. दरम्यान, शेतकऱ्याने 12 एकरांपैकी 10 एकरांतील भुईमूग पिकावर तणनाशकाची फवारणी केली. मात्र, झाले उलटेच. तण कमी होण्याऐवजी पीकच नष्ट झाले. कंपनीने मात्र यातून हात झटकले आहेत. यात अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असून, भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहगाव (भदाडे) येथील शेतकरी निकेश भिमराव टेकाडे यांनी तिष्टी (बु.) ता. कळमेश्वर येथील शेतकरी दशरथ यादवराव काळबांडे यांच्याकडील 12 एकर शेती 50 हजार रुपये वार्षिक यानुसार ठेकापत्र करून पेरली. 12 एकरांत भुईमुगाचा पेरा केला. शेती पेरण्याकरिता अंदाजे दीड लाखांचा खर्च आला. भुईमूग उगवल्याच्या 25 दिवसांनंतर 12 एकर शेतीपैकी 10 एकर शेतात बीएएसएफ या कंपनीच्या ओडिसी या औषधाची फवारणी केली.

त्यानंतर ओडिसी हे औषध संपले म्हणून त्याच शेतातील 2 एकर शेतात अदामा कंपनीचे शाकेद या औषधाची फवारणी केली. ओडिसी या तणनाशकाची फवारणी केलेल्या 10 एकरांतील सर्व पीक नष्ट झाले. शाकेदची फवारणी केलेले 2 एकरांतील पीक चांगले आहे. बीएएसएफ कंपनीचे ओडिसी हे भुईमुगावर लेबल क्‍लेम असलेले औषध आहे. त्यामुळे पीक कसे नष्ट झाले, हा प्रश्‍न आहे. यामुळे तरुण शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. 

कंपनी हात झटकले 
बीएएसएफ कंपनीने पिकाचा पंचनामा केला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही आमच्या औषधाची चूक नसून ते उधई लागल्यामुळे भुईमूग पीक नष्ट झाल्याचा निष्कर्ष काढला. कंपनी हात झटकले आहेत. त्यामुळे कृषी विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी होऊन कंपनीवर गुन्हा नोंदवून शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पीडित शेतकरी व शेतकऱ्यांनी केली आहे. 

(संपादन : मेघराज मेश्राम) 

go to top