esakal | हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाचा भटक्या कुत्र्याने घेतला जीव; विधवा आईवर कोसळला दुखाचा डोंगर

बोलून बातमी शोधा

Death of a youth in an accident in Nagpur

घटनेच्या दिवशी तो दुकानात गेला होता. परंतु, काही आवश्यक कामानिमित्त तो त्याच्या  एमएच ४९ / बीएच १०२८ क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यास निघाला. हुडकेश्वर हद्दीतील बेसा मार्गाने जात असताना अचानक एक भटका कुत्रा आडवा आला आणि दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला.

हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाचा भटक्या कुत्र्याने घेतला जीव; विधवा आईवर कोसळला दुखाचा डोंगर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अचानक बेवारस कुत्रा दुचाकीला आडवा आला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात आईला एकुलता एक असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नऊ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेसा रोडवरील अतिथी रेस्टॉरंटसमोर घडली. संदेश अशोक बावीस्कर (वय २८, रा. महाकालीनगर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा मानेवाडा येथे एका ड्रेस मटेरियलच्या दुकानात काम करीत होता. वडील नसल्याने त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण मामानेच पूर्ण केले. त्याला आई आणि एक बहीण आहे. बावीस्कर कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून तो दुकानात काम करायचा.

क्लिक करा - मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही; पहाटे उघडकीस आला थरार

घटनेच्या दिवशी तो दुकानात गेला होता. परंतु, काही आवश्यक कामानिमित्त तो त्याच्या  एमएच ४९ / बीएच १०२८ क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यास निघाला. हुडकेश्वर हद्दीतील बेसा मार्गाने जात असताना अचानक एक भटका कुत्रा आडवा आला आणि दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला. घसरत जाऊन त्याचे डोके दुभाजकावर आदळले. त्याला तातडीने मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जाणून घ्या - मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

हेल्मेटचे बेल्ट बांधले असते तर

घरी जात असताना संदेशने हेल्मेट आणि तोंडाला मास्क लावलेला होता. पण, हेल्मेट निकृष्ट दर्जाचे होते. शिवाय त्याचा मानेखाली बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्यानंतर तो खाली पडताच हेल्मेट दूरवर फेकले गेले आणि तिथेच घात झाला. हेल्मेट डोक्यातून बाहेर पडले आणि त्याचे डोके दुभाजकावर आदळले. जर त्याने हेल्मेटचा बेल्ट बांधलेला असता तर आज संदेश जिवंत असता...

संपादन - नीलेश डाखोरे