esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Death of youth because of treatment not in time

मात्र, रात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्याला चांगलेच वाटत नव्हते. रात्री तो त्रासानी विवळत होता. शेवटी त्याने मालकाला फोन करून मदतीसाठी प्रेरणा शाळेजवळ बोलावले. पवनची प्रकृती अधिकच खालावल्याचे समजताच मालकाने तिघांना त्याच्या मदतीसाठी पाठवले. मात्र, अंधार असल्यामुळे पवन तिघांना दिसला नाही.

आई... आई... माझी प्रकृती खूप खालावली गं; चालताही येई ना, मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : युवक ढाब्यावर काम करून घर चालवायचा... काही कामानिमित्त तो घरी परत गेला... काही दिवस थांबल्यानंतर तो परत ढाब्यावर कामावर आला... मात्र, त्याची प्रकृती बरी नव्हती. तेवढ्यात कोरोनाने डोक वर काढल्याने डॉलडाउन सुरू झाले. कुणालाही घराबाहेर निघाण्यास मज्जाव करण्यात आला. अशातच प्रकृती अधिकच यालावली... त्याने मदतीसाठी मालकाला फोन केला... मात्र, वेळवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला... ही घटना नागपूर जिल्ह्यातील विहीरगाव येथील रिंग रोडवर उघडकीस आली... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन वामन इंगळे... वय 27 वर्षे... राहणार पारडी... हा आऊटर रिंग रोडवरील एका सावजी ढाब्यामध्ये काम करीत होता. लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने तो 11 एप्रिलला सुटी घेऊन घरी गेला होता. मात्र, 14 ला तो परत ढाब्यावर आला. मात्र, यावेळी तो आजारी होता. देखरेख करण्यासाठी तो ढाब्यामध्येच थांबला आणि मालक घरी गेला.

ठळक बातमी - बापरे! दिवस उजळताच वाढतात रुग्ण; काय सुरू आहे या शहरात...

मात्र, रात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्याला चांगलेच वाटत नव्हते. रात्री तो त्रासानी विवळत होता. शेवटी त्याने मालकाला फोन करून मदतीसाठी प्रेरणा शाळेजवळ बोलावले. पवनची प्रकृती अधिकच खालावल्याचे समजताच मालकाने तिघांना त्याच्या मदतीसाठी पाठवले. मात्र, अंधार असल्यामुळे पवन तिघांना दिसला नाही. यामुळे तिघेही परत निघून गेले. वेळेवर उपचार न मिळाल्याने पवनचा मृत्यू झाला. 

नागरिकांना दिसला मृतदेह

पवनने मदतीसाठी ढाबा मालकाना फोन केला. मालकानेही त्याच्या मदतीसाठी तिघांना पाठवले. मात्र, अंधार जास्त असल्याने तिघांना पवन कुठेच दिसून आला नाही. तिघांनी त्याचा बराच शोध घेतला मात्र, काहीही उपयोग झाला नाही. हताश होऊन तिघेही घरी निघून गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी नागरिकांना मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच हुडकेश्‍वरचे एपीआय सत्यवान कदम पथकासह घटनास्थळावर पोहोचले. चौकशीदरम्यान संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 

पवनने आईला केला होता फोन

घरून ढाब्यावर कामासाठी जाण्यासाठी निघालेल्या पवनची प्रकृती खराबच होती. तरीही तो ढाब्याकडे जाण्यासाठी निघाला. मात्र, रात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. यामुळे त्याने आईला फोन केला. "आई... माझी प्रकृती खूप खालावली गं, चालताही येई ना...' असे त्याने सांगितले. मात्र, लॉकडाउन असल्यामुळे त्यांना मदतीसाठी येता आले नाही. तसेच पवनने ढाबा मालक आणि एका नातेवाईकाला फोनही केला होता. 

go to top