राष्ट्रसंतांच्या अध्यासनात घटले विद्यार्थी

मंगेश गोमासे
Thursday, 15 October 2020


माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी मोठ्या महत्त्वाकांक्षेने विद्यापीठामध्ये तुकडोजी महाराज अध्यासनाची सुरुवात केली होती. इतर विषयांप्रमाणे हा विषय नसून महाराजांच्या विचारांनी प्रेरित होत विद्यार्थ्यांनी खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करावी, व्यवसनमुक्तीचा संदेश द्यावा व स्वत: समाजसेवेचे प्रात्यक्षिक ज्ञान घ्यावा हा उद्देश अभ्यासक्रमातून व्यक्त करण्यात आला होता.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये माजी कुलगुरू डॉ. सि.प. काणे यांनी विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू केले. मात्र, ते सेवानिवृत्त होताच, प्रशासनाचे कमालिचे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे विभाग प्रमुख प्रा. प्रदीप विटाळकारांच्या नियोजनाचा अभाव, प्रात्यक्षिक शिक्षण नाही आणि विद्यावेतन मिळत नसल्याने विद्यार्थी संख्येत कमालिची घट दिसून येत आहे.

माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी मोठ्या महत्त्वाकांक्षेने विद्यापीठामध्ये तुकडोजी महाराज अध्यासनाची सुरुवात केली होती. इतर विषयांप्रमाणे हा विषय नसून महाराजांच्या विचारांनी प्रेरित होत विद्यार्थ्यांनी खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करावी, व्यवसनमुक्तीचा संदेश द्यावा व स्वत: समाजसेवेचे प्रात्यक्षिक ज्ञान घ्यावा हा उद्देश अभ्यासक्रमातून व्यक्त करण्यात आला होता.

खवय्यांनो, खात्री करून जेवणासाठी बाहेर पडा;  शहरातील ४० टक्के हॉटेल अद्याप बंदच

मात्र, विभागप्रमुख प्रा. प्रदीप विटाळकरांनी विभागामध्ये केवळ सैनिकी शासन सुरू ठेवले. विद्यार्थ्यांना दिवसभर वर्गामध्ये बसवून ठेवण्याशिवाय त्यांना कुठलीही प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले नाही. यामुळे सुरुवातील वीस विद्यार्थ्यांमधून शेवटीपर्यंत केवळ ५ विद्यार्थी वर्गात उरले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विभाग प्रमुखांच्या नियोजाच्या अभावाने विभागाची दैनावस्था झाली आहे.

विद्यावेतन देण्यातही दिरंगाई
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनामध्ये सुरुवातीला दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, यामध्ये काही वयोवृद्ध मंडळी वगळता फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. याकडे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे या उद्देशाने मासिक पाच हजार रुपये विद्याावेतन देऊन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षात वीसही जागांवर प्रवेश झाले. विद्यार्थ्यांचा हा कल बघता अध्यासनाला चांगले दिवस येतील असा विश्वाास व्यक्त केला जात होता. मात्र, आता प्रवेशित विद्यार्थ्यांनी अनेकदा वेळेत विद्यावेतन देण्यात न आल्यानेही या विभागाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased students in Rashtrasant Chair