'रेड झोन'मध्ये आहे म्हणून काय झालं? रुग्ण नसलेल्या भागात लॉकडाउन उघडण्याची मागणी

demand for opening lockdown in which are not coronavirus patient area
demand for opening lockdown in which are not coronavirus patient area

नागपूर : सुमारे चाळीस दिवस लॉकडाउनला लोटले आहेत. कोरोनाही बऱ्यापैकी आटोक्‍यात येऊ लागला आहे. आणखी काही दिवस उद्योग व व्यवसाय बंद ठेवल्यास गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण होऊन उपासमार ओढावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसलेल्या भागात उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका वस्तीत कोरोनाचा रुग्ण आढळला म्हणून जिल्ह्याला वेठीस धरणे अयोग्य असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. 

केंद्र सरकारने लॉकडाउनमधून काही सवलती दिल्या आहेत. त्यानुसार काही उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रचंड क्‍लिष्ट त्याकरिता घातल्या आहेत. त्यामुळे कोणीच उद्योग सुरू करण्यास तयार नाही. सुमारे दीड महिन्यांपासून मशिनरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्या नव्याने सुरू करताना अनेक तांत्रिक अडचणी येणार आहेत.

सध्याची शिथिलता गॅरेज उघडे मात्र सुटे भाग विक्रीची दुकाने बंद अशी आहे. त्यामुळे काहीच फायदा नाही. उद्योजकांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. मात्र, त्याचे कुटुंबीय उपाशी राहणार नाही. उद्योगात कम करणारे कर्मचारी, कमागारांची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे. उत्पादन आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कंपन्यांनी आता वेतन देण्यासही नकार दिला आहे. 

जिल्ह्याला शिक्षा नको

नागपूर जिल्ह्याचा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शहरातील सतरंजीपुरा, मोमिनपुरा परिसर वगळता इतरत्र रुग्ण नाहीत. मात्र, शहरातील सर्व सहा मतदारसंघ व जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांनाही बंदी लादण्यात आली आहेत. बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी ग्रामीण भागात आहेत. हा भाग सरसकट बंद ठेवल्याने काहीच उपयोग होणार नाही. 

ग्रामीणला ग्रीनझोनमध्ये टाका 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्यास ग्रीनझोनमध्ये टाकण्यात आहे. शहरात जेथे प्रादुर्भावाव तो भाग वळगता इतरत्र छोटी दुकाने सुरू करण्यात यावीत. त्यासाठी किराना दुकांनाप्रमाणे सोशल डिस्टिंसिंगचे नियम लावण्यात यावे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हळुहळू सुरळीत होतील. लोकांनाही दिलासा मिळेल. 
- प्रमोद मानमोडे, 
संस्थापक अध्यक्ष, निर्मल बॅंक समूह 

पुढील आदेशपर्यंत स्थिती जैसे थे 
नागपूर जिल्ह्याचा समावेश रेडझोनमध्ये आहे. लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून उद्याप मागदर्शक सूचना आल्या नाहीत. त्यामुळे नागपूरमध्ये पुढील आदेशपर्यंत स्थिती जैसे थे राहील. 
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com