
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या उद्देशाने सध्या जागोजागी उड्डाणपूल बांधले जात आहेत. सदर परिसरातही लिबर्टी टॉकीज ते मानकापूरदरम्यान अलीकडेच उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.
नागपूर : विकासाला कलेची जोड मिळाल्यास काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण सदरमधील नव्याने बांधलेला उड्डाणपूल आहे. लिबर्टी टॉकीज ते मानकापूरपर्यंतच्या या उड्डाणपुलाला चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक पेंटिंगद्वारे साज चढवून पुलाच्या सौंदर्यात आणखीणच भर घातली आहे. उड्डाणपुलाचा एकूणच लूक नागपूरकरांचेही लक्ष वेधून घेत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या उद्देशाने सध्या जागोजागी उड्डाणपूल बांधले जात आहेत. सदर परिसरातही लिबर्टी टॉकीज ते मानकापूरदरम्यान अलीकडेच उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
साडे चारकिलोमीटर अंतराच्या या उड्डाणपूलाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडे सोपविण्यात आली आहे. महाविद्यालयातील मुले-मुली एक विशिष्ट विषय (थीम) घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलाखालील रंगबिरंगी पिल्लर तसेच भिंतीवर आकर्षक चित्रे काढत आहेत. या चित्रांमुळे उड्डाणपूलाचे सौंदर्य खुलून दिसत असून, या मार्गाने ये-जा करणारे नागरिक व वाहनधारकही खुश आहेत. उड्डाणपूलावर लवकरच लायटिंगही लागणार आहे. पेंटिंग व लायटिंगची कामे पूर्ण झाल्यावर उड्डाणपूलाच्या सौंदर्यात आणखीणच भर पडणार आहे.
'मुळात ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आहे. विकासासोबतच सौंदर्यीकरणही होणे आवश्यक असल्याचे सांगून, त्यांनी ही जबाबदारी आमच्यावर सोपविली. त्यानंतर आम्ही विविध विषयांवर विचारविमर्श करून कामाला भिडलो. डिझायनर, चित्रकार व पेंटर मिळून सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत आहेत. '
दीप्ती देशपांडे,
डिझायनर
संपादन - अथर्व महांकाळ