वारिस पठाण यांना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

व्यवसायाने वकील असलेले वारिस पठाण एमआयएमचे नेते आहेत. मुंबईतील भायखळ विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. याहीपेक्षा वारिस पठाण यांची आणखी एक वादग्रस्त ओळख आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतल्यामुळं वारिस पठाण प्रकाश झोतात आले होते.

नागपूर : या देशातील हिंदू सहिष्णू आहेत, याचा अर्थ कमजोर आहेत असे नाही, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज म्हणाले. या देशात 100 कोटींपेक्षा जास्त हिंदू आहेत आणि त्यांच्यामुळेच देशात सर्वांना, म्हणजे अल्पसंख्यांकांनाही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, असे सांगत त्यांना एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा समाचार घेतला. 

येथील साधना सहकारी बॅंकेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 100 कोटींवर आम्ही 15 कोटी भारी ठरू, असे चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केले. त्यावरून देशात ठिकठिकाणी वारिस पठाण यांचा निषेध आणि निदर्शने सुरू आहेत.

फडणवीस म्हणाले, हिंदुंच्या सहिष्णूतेला दुर्बलता समजण्याचा मुर्खपणा कुणीही करू नये. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई कडक करावी, अशी मागणी केली.

 

 

देशातील हिंदू सहिष्णू आहेत, पण कमजोर नाहीत
वारिस पठाण यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलीय. मनसे अधिकृत या ट्‌विटर अकाऊंटवरून, पठाण यांना झोडपले. मनसेने म्हटले की, "आम्ही...' "तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकेच सांगतो की, जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल! या ट्‌विट वर तुफान रिऍक्‍शन आल्या. 

कोण आहेत वारिस पठाण? 
व्यवसायाने वकील असलेले वारिस पठाण एमआयएमचे नेते आहेत. मुंबईतील भायखळ विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. याहीपेक्षा वारिस पठाण यांची आणखी एक वादग्रस्त ओळख आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतल्यामुळं वारिस पठाण प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर सलमान खानच्या हीट अँड रन केसमध्येही वारिस पठाण यांनी सलमानचे वकीलपत्र घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devndra fadanvis reaction on waris pathan nagpur