जिल्हा न्यायालयातील बार रूम उपलब्ध करून देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

कोरोनावर प्रतिबंध म्हणून अद्याप बार रुम खुल्या केल्या गेल्या नाहीत. त्या अनुषंगाने जिल्हा वकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायमूर्ती रवी देशपांडे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले.

नागपूर : जिल्हा न्यायालय आणि कामठी न्यायालयातील बार रुम वकिलांसाठी खुल्या करुन द्याव्या, अशी विनंती जिल्हा वकिल संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्याकडे करण्यात आली. सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज सुरु झाले. मात्र, कोरोनावर प्रतिबंध म्हणून अद्याप बार रुम खुल्या केल्या गेल्या नाहीत. त्या अनुषंगाने जिल्हा वकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायमूर्ती रवी देशपांडे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले.

या चर्चे दरम्यान जिल्हा वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. कमल सतुजा, सचिव ऍड. नितीन देशमुख, ऍड. प्रवीण गजवे, ऍड. नरेश नेभाणी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी जारी केलेल्या सुचनेनुसार न्यायालयाचे कामकाज सुरु झाले. मात्र, बार रुम पुढील 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे वकिलांची न्यायालयाच्या परीसरामध्ये कामकाज करण्यासाठी हक्काची जागा हिरावल्या गेली आहे.

बापरे : नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची 'शिकार'

इतर प्रकरणांवर सुनावणी सुरु असताना थांबायचे कुठे असा प्रश्‍न न्यायालयातील वकिलांपुढे उभा झाला आहे. अनेक वकिल बार रुममध्ये बसून प्रकरणांशी संबंधीत नोंदी आणि इतर कामकाज करतात. न्यायालयामध्ये बार रुम असल्याने वकिलांना कामकाज करणे सोयीचे होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचू नये म्हणून नव्या नियमांनुसार बार रुम काही कालावधींसाठी बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे, वकिलांची कुचंबना होते आहे. नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींनी निवेदन स्विकारले. तसेच, हा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मांडत त्यावर तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Bar Association says open-the bar room-the District Court