नागपूरच्या दिव्यांग खेळाडूंना मिळणार हक्काचे मैदान 

नरेंद्र चोरे
Friday, 6 November 2020

सरावासाठी मैदान, क्रीडा साहित्य व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू पीयूष अंबुलकर यांच्या नेतृत्वात सोमवारी पुंड यांना निवेदन देत मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुंड यांनी दिव्यांगांना गुरुवारी चर्चेसाठी बोलावले. येत्या दहा दिवसांत दूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

नागपूर : दिव्यांग खेळाडूंना हक्काच्या मैदानासाठी संघर्ष करावा लागत आहे. दिव्यांगांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा क्रीडाधिकारी व प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी दिले आहे. याशिवाय शासनातर्फे खेळाडूंना क्रीडा साहित्यही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

सरावासाठी मैदान, क्रीडा साहित्य व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू पीयूष अंबुलकर यांच्या नेतृत्वात सोमवारी पुंड यांना निवेदन देत मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुंड यांनी दिव्यांगांना गुरुवारी चर्चेसाठी बोलावले. येत्या दहा दिवसांत दूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. एक- दोन दिवसांत मैदानाची पाहणी करून त्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांमध्ये विनामूल्य राखीव जागा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. याशिवाय दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी लागणारी क्रिकेट किट, नेटससह अॅथलेटिक्स, आर्चरी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, स्विमिंगचे साहित्य व कबड्डी मॅट्सही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*

 

राज्य शासनातर्फे गरीब खेळाडूंनाही प्रत्येकी २५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. एकूण १३ खेळाडूंच्या बँक खात्यात ही मदत जमा केली आहे. दैनिक 'सकाळ'ने लॉकडाउनकाळात 'व्यथा खेळाडूंची' ही वृत्तमालिका प्रकाशित करून खेळाडूंच्या अडचणी शासनदरबारी मांडल्या होत्या. या मालिकेनंतर राज्य शासनाने ही मदत जाहीर केली होती हे उल्लेखनीय. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम मिश्रा, सचिव संजय भोसकर, धनंजय उपासनी, अनिल कोटांगळे, संदीप गवई, गुरुदास राऊत, जनक साहू, रोशनी रिनके, मतीन बेग, रिंकेश बिसेन, सचिन पाखरे, मंगला अडमकर, अभिषेक ठवरे, रोशनी रिंके उपस्थित होते. 

 

मदत झालेले खेळाडू 
ज्योती चव्हाण, संदीप गवई, जयश्री ठाकरे, शुभांगी राऊत, माधवी वानखेडे, दीपाली सबाने, प्राजक्ता गोडबोले, अभिषेक ठवरे, निकिता राऊत, दामिनी रंभाड, प्रतिमा बोंडे, रोशनी रिंके व उर्वशी शनेश्वर. 
 
संपादन : प्रशांत रॉय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang Players of Nagpur will get the Play Ground