सायंकाळी ५.३९ ते ८.३० या वेळेत करा लक्ष्मीपूजन; सर्वोत्तम मुहूर्त

नरेंद्र चोरे
Saturday, 14 November 2020

लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त प्रदोषकाली सायंकाळी ५.३९ ते रात्री ८.३० वाजतापर्यंत आहे. लाभ वेळा ६.३० ते ८ पर्यंत, शुभ वेळा रात्री ९.३० ते ११ पर्यंत आणि अमृत वेळा रात्री ११ ते १२.३० पर्यंत आहे.

नागपूर : दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आज (शनिवार) लक्ष्मीपूजनासह नरक चतुर्दशीही आहे. नरक चतुर्दशीला चंद्रोदयकाली म्हणजेच पहाटे ५.०९ च्या सुमारास अभ्यंगस्नान करावे. आज निज अमावस्या अश्विन कृष्ण चतुर्दशी, दुपारी २.१५ नंतर अमावस्या, नक्षत्र स्वाती रात्री ८.०६ पर्यंत, नंतर विशाखा, चंद्र रास तूळ, राहू काळ सकाळी ९.२२ ते १०.५२. आज प्रदोषकाली अमावस्या असल्याने लक्ष्मीपूजन आजच करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त प्रदोषकाली सायंकाळी ५.३९ ते रात्री ८.३० वाजतापर्यंत आहे. लाभ वेळा ६.३० ते ८ पर्यंत, शुभ वेळा रात्री ९.३० ते ११ पर्यंत आणि अमृत वेळा रात्री ११ ते १२.३० पर्यंत आहे.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

वरीलपैकी कोणत्याही काळात प्रसन्नतेने व श्रद्धेने लक्ष्मीपूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहून भरभराट होते, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do Lakshmipujan at this time