शिवसेनेतून हाकललेला खंडणीखोर मंगेश कडव शरण येण्याच्या तयारीत ?

mangesh kadav
mangesh kadav
Updated on

नागपूर : शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला माजी शहरप्रमुख मंगेश कडव हा आता पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असल्याची शहरभर पसरली आहे. तो कधी शरण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगेश कडवची पत्नी डॉ. रुचिता हिला क्राईम ब्रॅंचने अटक केल्यानंतर चांगला हिसका दाखवला. पीसीआरमध्ये असलेल्या डॉ. रुचिताला त्रास होऊ नये म्हणून मंगेशची फडफड सुरू आहे. तो लवकरच एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून पोलिसांना शरण जाणार असल्याची चर्चा शहरभर आहे. फरार असलेला मंगेश डॉ. रुचिता हिच्यासोबत व्हॉट्‌सऍपवरून संपर्कात होता. तिला व्हॉटसऍप कॉलिंग आणि चॅटिंग करीत होता, अशी माहिती आहे.

मंगेशच्या पत्नीला  पीसीआर

मंगेश कडव याची पत्नी डॉ. रुचिता कडव(वय 38,रा. अभ्यंकरनगर) हिला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. तिला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने डॉ. रुचिता हिला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा माजी शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्याविरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर व सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत खंडणी व फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुना सुभेदार येथील दिनेश रामचंद्र आदमने (वय 42) यांनी 2013 मध्ये मंगेश कडव व त्याची पत्नी डॉ. रुचिता कडव यांच्याकडून मानेवाड्यातील अमरिवा अपार्टमेंटमधील फ्लॅट 16 लाख रुपयांना खरेदीचा व्यवहार केला. आदमने पैसे परत मागितले असता कडव याने आदमने यांना ठार मारण्याची धमकी दिली. आदमने यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी कडव व त्याची पत्नी डॉ. रुचिताविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला. कडवविरुद्ध दाखल प्रकरणांचा तपास गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला.

खंडणीविरोधी पथकाने सोमवारी डॉ. रुचिताला अटक केली. आदमने यांना देण्यात आलेल्या धनादेशावर आरोपी डॉ. रुचिताची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी तपासायची आहे. फरार मंगेश कडव हा कुठे आहे याची माहिती काढायची असल्याने रुचिताची पोलिस कोठडी देण्याची विनंती गुन्हेशाखेने न्यायालयाला केली. त्यामुळे न्यायालयाने डॉ. रुचिता हिची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.
पोलिस दलात लवकरच मोठे फेरबदल, कुणाची लागणार लॉटरी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com