लॉकडाऊनमध्येही महिलांवर अत्याचार सुरूच; तक्रारी मात्र कमी

domestic voilence
domestic voilence

नागपूर : लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष महिलांवर  अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. फोनवरून कुणाला मदत मागावी तर, राज्य महिला आयोगाचे हेल्पलाईन नंबरही बंद आहेत. अशा परिस्थितीत घरातच राहून अनेकींना अत्याचार सहन करावा लागत आहे.
राज्य महिला आयोगाचे मुख्य कार्यालय अंधेरी, मुंबई येथे असून, ते आता पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या कार्यालयातील हेल्पलाईन नंबरवर कॉल केला असता पलीकडून कुणीही फोन उचलत नाही. दरम्यान जिल्ह्यातील दहा झोन कार्यालये सुरू असली तरी, महिनाभरात येथे एकही तक्रार आलेली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. संचारबंदीमुळे एक महिन्यापासून शाळा नोकरी, व्यवसाय, उद्योग बंद पडल्याने पुरुष घरांमध्ये  आहेत, त्यांच्या सततच्या कुरकुरी व त्रास महिलांना होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान मुलांकडे सतत लक्ष द्यावे लागत असल्याने अंतिमतः महिलांच्या अर्थार्जनावरही त्याचा परिणाम झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या अनुसया गुप्ता यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील मानसिक व शारीरिक हल्ले वाढले आहेत. दिवसभर पुरुष घरात बसलेले असतात, त्यांना आलेले वैफल्य ते घरातल्या महिलांवर काढतात. परंतु, या काळात महिलांना बाहेर पडता येत नाही, माहेर दूर आहे आणि नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रारही करायची नाही त्यामुळे घरातच अन्याय सहन करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे.

संयम संपत चालला..
काही सामाजिक संशोधकांच्या मते महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार पतीच्या किंवा घरातल्या अन्य पुरुषाला असलेल्या दारुच्या व्यसनामुळे अधिक होत असतात. राज्यात लॉकडाऊनच्या काळात दारू, तंबाखु सारखी व्यसने पूर्ण करता येत नसल्याने, पुरुषांची चिडचिड वाढली आहे. दुसरीकडे घरकाम, मुलांचा सांभाळ या जबाबदाऱ्या  स्त्रियांवर येत असल्याने त्यांचाही संयम संपत चालला आहे.

केवळ तीन तक्रारी
राज्य महिला आयोगाचे तालुकास्तरावरील आणि शहरातील झोनमधील समुपदेशन केंद्र लॉकडाऊन काळातही सुरू आहे. मात्र, या केंद्राला गेल्या एक महिन्यात लेखी स्वरूपात केवळ तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. फोनवर तक्रारी येतात अशावेळी कौटुंबिक वादाच्या प्रकरणात प्रत्यक्ष समुपदेशन करण्याची आवश्‍यकता असते. परंतु, लॉकडाऊनमुळे कुठेही जाता येत नसल्याने, अडचणी वाढल्या आहेत.
अनिल रेवतकर, जिल्हा समन्वयक, राज्य महिला आयोग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com