डॉन अरुण गवळीला कोरोनाचा विळखा; कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री 

Don Arun Gawli tested corona positive in Nagpur central Jail
Don Arun Gawli tested corona positive in Nagpur central Jail

नागपूर ः नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी आणि कुख्यात शेखूसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्रयोगशाळातून प्राप्त झाला. यामुळे मध्यवर्ती कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना या सर्व बंदिवानाना कारागृहातील विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

कोरोनाचा उद्रेक उपराजधानीत झाल्यानंतर जुलै २०२० मध्ये कारागृहात कोरोना विषाणूने आपले अस्तित्व दाखविणे सुरू केले होते. कारागृहात सहाशेवर कोरोनाबाधित आढळून आले होते. केवळ एकाला बाधा झाल्यामुळे अख्खे कारागृह कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनाचा उद्रेक झाला होता, परंतु मृत्यूपासून कारागृह दूर होते. 

या उद्रेकावर कारागृह प्रशासनाने वैद्यक तज्ज्ञांच्या उपचार यंत्रणेतून विजय मिळवला. मात्र पुन्हा एकदा कारागहात कोरोनाची एन्ट्री झाली. यामुळे येथे भितीचे वातावरण पसरले आहे. उपराजधीनीतील दैनंदीन व्यवहार सैल होत असताना पुन्हा एकाचवेळी पाच बंदिवान कोरोनाबाधित आढळले. 

यात दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाला. गवळीसह पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला. यांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेल्या पाचही बंदिवानांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी तसेच त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये गवळीसह कुख्यात शेखूचाही समावेश आहे. अन्य तिघे बंदिवान आहेत. 
-अनुपकुमार कुमरे, कारागृह अधीक्षक, नागपूर

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com