समाजकल्याणच्या बैठकीत गाजले ड्रायफूड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

ग्रामीण विकासाचा भार जिल्हा परिषदेवर असून मिनी मंत्रायल सुद्घा म्हटल्या जाते. यामुळे ग्रामीण जनतेशी संबंधित विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

नागपूर  : ग्रामीण विकासाचा भार जिल्हा परिषदेवर असून मिनी मंत्रायल सुद्घा म्हटल्या जाते. यामुळे ग्रामीण जनतेशी संबंधित विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. पंरतु काही समित्यांच्या बैठकीत विषयपत्रिकेपेक्षा इतर मुद्यांवर अधिक चर्चा असते. समाजकल्याण समितीच्या बैठकीत ड्रायफूडवरून चांगलाच वादंग झाला. ड्रायफूड आल्याव बैठकीचे कामकाज पुढे गेले. 

जिल्हा परिषदेत दहा विषय समित्या आहेत. प्रत्येक समित्यांची साधारणत: महिन्यातून एकदा बैठक होते. विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा होवून त्यांना मार्गी लावण्याबाबत येथे चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा बैठकीत वायफळ विषयावर चर्चा होते. समाजकल्याण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सदस्यांसोबत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समिती सभापती नेमावली मोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. बैठक सुरू होताच काही सदस्यांनी नाश्‍त्याचय विषय काढला. कोरोनामुळे नाश्‍ता बोलावण्यात आले नसून चहा, बिस्कुट आणण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

सदस्य लांबून जेवण न करताच आल्याचे सांगून नाश्‍ता नसल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली. यातच एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी नाश्‍ता ऐवजी ड्रायफूड का मागविले नाही, असा प्रश्‍न केला. यावर सर्वच सदस्यांनी एकमत व्यक्त दर्शविले. यामुळे कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. बैठकीत ड्रायफूडचा मुद्‌दाच चर्चेला आला. अखेर कर्मचाऱ्यांनी दुकान गाठत ड्रायफूड आणले. ड्रायफूडचा स्वाद घेतल्यावरच सदस्य शांत झाले. 
यानंतर लगेच काही मिनिटात सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नसल्याचे सूत्रांकडून समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry food roared at the social welfare meeting

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: