
नागपूर : घरी आणि एखाद्या भाड्याच्या खोलीत शिकवणी वर्ग घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बहुतांशी शिक्षकांवर कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद करण्याची परिस्थिती ओढावली आहे. कोरोनामुळे यावर्षी एकाही विद्यार्थ्याने क्लासेसमध्ये प्रवेश घेतलेला नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ऑनलाईनची सोय नसल्याने बऱ्याच ट्युशन क्लासेसच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांसह विविध स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून पालक विद्यार्थ्यांना क्लासेस लावून देतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात नर्सरी ते आठव्या वर्गातील मुलांचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी क्लासेसचे पीक गल्लोगल्ली आले आहेत. शहरात डीएड, बीएड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बेरोजगार तरुण आणि शिक्षकांकडून क्लासेसची सुरुवात करीत आपला उदरनिर्वाह चालवितात.
या क्लासेसमध्ये आसपासची मुले आणि ज्यांच्याकडे अधिकचे पैसे देऊन चांगल्या क्लासेसमध्ये प्रवेश घेता येणे शक्य नाही अशा वर्गातील मुलांचा अधिक भरणा असतो. या मुलांच्या शुल्कापोटी आलेल्या पैशातूनच अनेकांचे घर चालते. या व्यवसायातून अनेकांनी आपले करिअरही घडविले आहे. बहुतांशी क्लासेस आजही तिथे शिकविणाऱ्या शिक्षकांच्याच नावाने प्रसिद्ध असतात.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या प्रादुर्भावामुळे बड्या क्लासेसने ऑनलाइन एज्युकेशन देण्यास सुरुवात केली. झूम आणि इतर ऍपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. छोट्या क्लासेसद्वारेही हे तंत्रज्ञान स्वीकारण्यात येत असले तरी, त्याचा विद्यार्थ्यांकडून मर्यादित वापर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक मुलेही आता क्लासेसपासून दुरावत असल्याचे चित्र आहे.
शाळांचे नवीन सत्र सुरू होईल काय? याबाबत पालकांच्या मनात साशंकता असल्याने त्यांनीही क्लासेस लावण्याचे मनात आणलेले दिसून येत नाही. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास विद्यार्थी कसे मिळणार हा प्रश्न आहे. केजी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जवळपास घरीच सर्व साहित्य उपलब्ध होत असून पालकांद्वारे त्यांना पाठविण्याची मानसिकता नसल्याने हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.
रोजगाराचा दुसरा मार्ग नाही
अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कळत नसल्याची बोंब आहे. शिवाय काही घरात एकाच व्यक्तीकडे मोबाईल असल्याने ऑनलाईन शिकविण्याची सोय होत नाही. याशिवाय सर्व नियम पाळून शिकविण्याची इच्छा असली तरी, सध्या टाळेबंदी असल्याने तेही करता येत नाही. शिवाय दुसरा कुठलाही रोजगाराचा मार्ग नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.
डॉ. तेजश्री दातारकर (माथनकर), यश ट्युशन क्लासेस, नवीन सुभेदार ले-आऊट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.