नागपूर : सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदीचा वापर करूनही महापौर संदीप जोशी एका कोरोनाबाधित असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.
पुढील सात दिवस ते घरी विलगीकरणात राहणार असून बुधवारी सायंकाळनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीच्या पायाभरणीनिमित्त शहरातही मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापौर संदीप जोशीही बुधवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान ते कोरोनाबाधित असलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आले. याबाबतही त्यांना बुधवारी सायंकाळी कळले. त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला.
महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाली नाही. ते उत्तम आहे, अशी माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केली आहे. परंतु पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहणार असल्याचे पोस्टमध्ये नमुद केले आहे. बुधवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत त्यांच्या संपर्कात जे कुणी आले असेल त्यांनीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
महापालिकेतही काही दिवसांपूर्वी अग्निशमन विभागाचे १४ कर्मचारी पॉजिटिव्ह आढळून आले होते. त्यापूर्वी काही अधिकाऱ्यांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.