दुरांतो, हमसफर, विदर्भ, महारष्ट्र ‘ऑन ट्रॅक’, सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांना दिलासा

योगेश बरवड
Thursday, 8 October 2020

मुंबई दुरांतो, पुणे हमसफर, विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेसचा समावेश आहे. तूर्त या गाड्या विशेष गाड्या म्हणूनच धावतील. सणासुदीच्या तोंडावर या गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूर :  कोरोनाची भीती हळुहळू दूर होत असताना रेल्वेसेवा पुन्हा बहाल करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी धावणाऱ्या महत्त्वपूर्ण गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्याची आली आहे. नागपूरशी संबंधित सर्वाधिक प्रवासी संख्या असणाऱ्या १२ प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत. यात मुंबई दुरांतो, पुणे हमसफर, विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेसचा समावेश आहे. तूर्त या गाड्या विशेष गाड्या म्हणूनच धावतील. सणासुदीच्या तोंडावर या गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूरमार्गे दररोज सहा व साप्ताहिक स्वरूपात सहा गाड्या धावतील. ०२२९० नागपूर-मुंबई विशेष ट्रेन शुक्रवार (ता.९) पासून नागपूरहून सुटेल. या गाडीची वेळ व थांबे मुंबई दुरांतो प्रमाणे राहतील. ०२२८९ मुंबई-नागपूर विशेष ट्रेन शनिवारपासून मुंबईहून रवाना होईल. या गाडीची वेळ व थांबे नागपूर दुरांतोप्रमाणे राहतील. ०२१०५ मुंबई-गोंदिया विशेष ट्रेन शुक्रवारपासून (ता.९) मुंबईहून रवाना होईल. या गाडीची वेळ व थांबे विदर्भ एक्स्प्रेस प्रमाणे राहील. ०२१०६ गोंदिया-मुंबई विशेष ट्रेना शनिवार (ता.१०) पासून गोंदियाहून सुटेल. या गाडीची वेळ व थांबे विदर्भ एक्‍स्प्रेसप्रमाणे असतील. या गाड्यांची संरचनाही जुन्या गाड्यांप्रमाणेच असेल. 

मागील टर्मचे विरोधक मॅनेज होते,  निधान यांचा पलटवार

तसेच ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया विशेष ट्रेन ११ऑक्टोबरपासून धावेल. तर, ०१०४० गोंदिया - कोल्हापूर विशेष ट्रेन १३ ऑक्टोबरपासून धावेल. या गाडीची संरचना व वेळा महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रमाणेच असतील. तथापि, भवानीनगर, चांदूर रेल्वे, जलम, जरदेश्वर, मसूर, पुनतंबा, सेवाग्राम, तरगाव, तकारी, वलिवडे स्थानकावर थांबा असणार नाही. याचप्रमाणे ०१४१७ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुणे- हमसफर एक्स्प्रेसच्या वेळ, संरचनेनुसार धावेल. ०१४१८ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष ट्रेन १६ ऑक्टोबरपासून नागपूर-पुणे हमसफर एक्स्प्रेसच्या वेळेनुसार धावेल. ०२२३९ पुणे – अजनी साप्ताहिक विशेष ट्रेन १७ ऑक्टोबरपासून पुण्याहून रवाना होईल.०२२४० अजनी-पुणे साप्ताहिक विशेष ट्रेन १८ पासून धावेल या गाडीची वेळ, संरचना व थांबे यापूर्वीच्या अजनी-पुणे एक्स्प्रेसप्रमाणे असतील. ०२२२४ अजनी– पुणे साप्ताहिक विशेष ट्रेन १३ ऑक्टोबरपासून धावेल. यागाडीची वेळ व संरचना अजनी-पुणे एसी एक्स्प्रेसप्रमाणे राहील. ०२२२३ पुणे-अजनी साप्ताहिक विशेष ट्रेन १६ ऑक्टोबरपासून पुण्याहून सुटेल. यागाडीची रचाना, वेळ व थांबे पुणे-अजनी एसी एक्स्प्रेसप्रामाणे असतील. सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. 

कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश 
कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांसाठी असणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकाच्या आत प्रवेश मिळेल. प्रत्येकाला पेस शिल्ड व मास्क लावणे बंधनकारक असेल. दोनतासांपूर्वीच प्रवाशांना स्टेशनवर यावे लागेल. अजार नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची संधी मिळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duranto, Humsafar, Vidarbha, Maharashtra On Track