esakal | चार शाळांना शिक्षण विभागाचा दणका; अतिरिक्त शुल्क वसूल केल्याने १३ कोटींची वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

The education department recovered Rs 13 crore from four schools

शिक्षण विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या नारायणा आणि स्कूल ऑफ स्कॉलर या शाळांवर यापूर्वी शिक्षण विभागाने कारवाई केली आहे.

चार शाळांना शिक्षण विभागाचा दणका; अतिरिक्त शुल्क वसूल केल्याने १३ कोटींची वसुली

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : पालकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या आणखी चार शाळांना शिक्षण विभागाने दणका दिला आहे. या चारही शाळांकडून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ आणि २०१९-२० या वर्षांमध्ये अतिरिक्त शुल्काच्या नावावर १३ कोटींची लूट केल्याचा आक्षेप घेत, ती रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम एका महिन्यात पालकांना परत द्यायची असल्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

शिक्षण विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या नारायणा आणि स्कूल ऑफ स्कॉलर या शाळांवर यापूर्वी शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे यानंतरही काही शाळांवर कारवाई होणार असे चित्र दिसून येत होते. त्यानुसार आता चार शाळांवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कारवाई केली आहे.

अधिक माहितीसाठी - सावधान! तुम्ही अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाता का? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर परिणाम

बेसा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जाफरनगर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूल, हजारी पहाड येथील सांदीपनी स्कूल व हिवरीनगर येथील सेंट झेव्हियर्स या शाळांचा यात समावेश आहे. या शाळांनी पालकांकडून तीन वर्षांत सुमारे १३ कोटींची अधिकची शुल्क वसुली केल्याचे चौकशीत आढळून आले. शाळांना महिनाभरात अतिरिक्त शुल्क परत करायचे असून तसा अहवालदेखील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.

अशी आहे रक्कम (कोटी) 

  • पोद्दार इंटरनॅशनल स्कूल - ४,७७,४९,७२७ 
  • सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूल - ३,०१,५१,२९० 
  • सेंट झेव्हीअर - १,५५,४४,३१५ 
  • सांदिपनी स्कूल - ३,४७,३६,०३९
go to top