नो टेंशन! ऍपद्वारे होणार आता अकरावीचे प्रवेश

image
image

नागपूर : अकरावीची प्रवेशप्रक्रिया अधिक सोपी व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यात सहभागी होता यावे, यासाठी खास मोबाइल ऍप उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवरच अकरावी प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया पार पाडता येणे शक्‍य होणार आहे.

शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमाने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने ऍप सुरू करण्यात येणार आहे. या ऍपमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून विविध सुविधा एका क्‍लिकवर असतील. सध्या विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. यात अर्जाचा पहिला भाग भरता येईल. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे आसन क्रमांक नमूद करायचा आहे. त्यानंतर त्यांचा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असलेला सर्व तपशील मिळेल. हा तपशील तपासून विद्यार्थ्यांना शिक्कामोर्तब करायचे आहे. विद्यार्थ्यांनी आवश्‍यक ती प्रमाणपत्रे अपलोड करावीत, असे आवाहनही शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - नाही शाळा, नाही शिकवणी....तरीही वाचा दिव्यांग अथर्वच्या यशाची कहाणी

माहिती सुविधा केंद्र होणार सक्षम
विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत अडचण येऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वीच माहिती सुविधा केंद्र सुरू केले होते. त्या माध्यमातून विद्यार्थी-पालकांच्या समस्या सोडवल्या जातात. यंदादेखील हे माहिती सुविधा केंद्र कार्यान्वित केले गेले आहे. माहिती सुविधा केंद्राचे काम दोन कर्मचारी सांभाळत आहेत. या माहिती सुविधा केंद्राद्वारे महाविद्यालयांना येणाऱ्या समस्याही सोडविण्यात येत आहेत. लवकरच या माहिती सुविधा केंद्रामधील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मोबाइल ऍपची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे ऍपही विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
 

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com