पुन्हा परतलाय मालिकांचा तो भावपूर्ण काळ; बच्चे कंपनीही एंगेज

That emotional time of the returning series; Baby Company Engage
That emotional time of the returning series; Baby Company Engage
Updated on

नागपूर : नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या दूरदर्शनवरील रामायण व महाभारत या मालिकांची क्रेझ केवळ चाळीशी ओलांडलेले पुरुष; महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येच नाही, मोबाईलवेड्या बच्चेकंपनीलाही या मालिकांनी वेड लावले आहे. सध्या घराघरांमधील लहान मुले या पौराणिक मालिकांचा आनंद घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य व केंद्र सरकारने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अनेक जण नाईलाजाने का होईना आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील लोकांचा अपवाद वगळता बहुतेक जण घरी बसून आहेत. नेमक्‍या या स्थितीचा फायदा घेत दूरदर्शनने रामायण व महाभारत या मालिकांचे राष्ट्रीय वाहिनीवरून पुनःप्रसारण सुरू केले. जुन्या पिढीतील अनेकांनी या मालिका टीव्हीवर पाहिल्या आहेत. मात्र आजची युवा पिढी त्या आनंदापासून वंचित होती. कोरोनामुळे का होईना त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. 30-35 वर्षांपूर्वी ज्यांनी या मालिका पाहिल्या, त्यांच्या आनंदात पुन्हा भर तर पडलीच, शिवाय आजच्या पिढीतील लहान मुलांनाही हा परमानंद प्रदान केला आहे. लहान मुले या दोन्ही मालिकांमध्ये विशेष रुची दाखवित असल्याचे चित्र सध्या घराघरांमध्ये पाहायला व अनुभवायला मिळत आहे. बच्चेकंपनी परिवारासोबत रामायण व महाभारताचा आनंद घेत आहेत. सर्वच जण सकाळी व सायंकाळी नऊ वाजताची आतुरतेने वाट पाहात असतात. या निमित्ताने मुलांना पौराणिक इतिहास जाणून घेण्याची तसेच त्यापासून काहीतरी शिकण्याची सुवर्णसंधी तर मिळालीच, शिवाय मोबाईल व इंटरनेटच्या वाईट सवयींपासून दूर ठेवण्यातही काही प्रमाणात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com