नागपूर जिल्हयातील या एकाच तालुक्यात होतात दररोजचे मृत्यू, काय झाले या शहराला?

नागपूर जिल्हयातील या एकाच तालुक्यात होतात दररोजचे मृत्यू, काय झाले या शहराला?

कामठी (जि.नागपूर): तालुक्यात दर दिवसाला बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. आज पुन्हा कामठीतील कुंभारे कॉलोनी येथील एका ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ६.३० वाजता मेडीकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला कोरोनासह सारीच्या आजाराचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील वीस दिवसांपासून सतत एकामागे एक एकोणविस जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांनी सातशेचा आकडा पार केला. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा तब्बल ३९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

सोमवारी एका महिलेचा मृत्यू
शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनासह सारीच्या आजाराने सुद्धा हातपाय पसरल्यामुळे बाधीत रुग्णांची व मृतांची संख्या जलद गतीने वाढत आहे. गुमथळा येथील हल्दीराम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बाधीत कामगार आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे. त्यातील ३४३ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले तर अठरा रुग्ण दगावले असून ३५९ रुग्ण अॅक्टिव आहेत, तर आज रॅपिड अँटीजेन चाचणी केलेल्या अनेकांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.

ग्रामीणमध्येही घातला धुमाकुळ
आज मिळालेल्या ३९ रुग्णांमध्ये शहरातील २५, कामठी छावणी परीषद क्षेत्रातील चार तर ग्रामीण भागातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक सहा, येरखेडा दोन, घोरपड, आजनी व रनाळा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. गुमथळा येथील हल्दीराम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या संख्येने बाधीत कामगार आजूबाजूच्या गावात आढळून येत आहेत. यात परिसरातील आजनी, गुमथळा, नेरी, भूगाव, उमरी, बीड गाव येथील रुग्णांचा समावेश आहे. शहरातील २५ रुग्णांमध्ये जुनी खलाशी लाईनमध्ये सर्वाधिक सात रुग्ण, पेरकीपुरा चार, नया गोदाम, पिली हवेली तसेच शहरातिल मध्यभागी असलेल्या ‘हाईप्रोफाइल’ समजल्या जाणाऱ्या रामेश्वरम् सोसायटीतील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. गवळीपुरा, जुनी ओली, दाल ओली नं.१ व दाल ओली नं.२, फुटाणा ओली, पोलिस लाईन, रमा नगर व हैदरी चौकातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज पुन्हा कामठीतील कुंभारे कॉलोनी येथील एका ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ६.३० वाजता मेडीकलमध्ये उपचारादरम्यान श्वसनक्रिया बंद झाल्याने मृत्यू झाला. २७ जुलै रोजी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिला कोरोनासह सारीच्या आजाराचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू
मागील वीस दिवसांपासून सतत एकामागे एक १९ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. आज पॉझिटिव्ह मिळालेल्या या सर्व ‘हायरिस्क’ रुग्णांना उपचारार्थ नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले, तर ‘लोरिस्क’ रुग्णांना त्यांच्या निवासस्थानात गृहविलगीकरण करून त्यांचा निवासस्थान परिसर प्रतिबंधित करण्यात आले. रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन नजीकच्या विविध विलीगीकरण कक्षात हलविण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र काही बाधित रुग्ण घरीच असून त्यांचे निवासस्थानसुद्धा सील न केल्याने ते परिसरात वावरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

एका कंपनीचा हलगर्जिपणा भोवतोय
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा आता कामठी तालुक्यातील शहरी भागानंतर ग्रामीण भागात शिरकाव होऊ लागला आहे. कामठी तालुक्यातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाच पसरला असून गुमथळा येथील एका कंपनीत काम करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. वास्तविकता या कंपनीने सुरक्षात्मक दृष्टिकोनातून कंपनीतील समस्त मजूर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेणे अपेक्षित होते. तसे पत्र सुद्धा संबंधित तहसील प्रशासनाकडून कंपनीला देण्यात आले होते. मात्र कंपनीच्या हेकेखोरपणामुळे पाहिजे तशी सुरक्षितता व सावधानता न बाळगल्याने आजच्या स्थितीत ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बहुतांश हे त्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्याची नोंद आहे. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे. त्यातील ३४३ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले, तर अठरा रुग्ण दगावले असून ३५९ रुग्ण अॅक्टिव आहेत. आज रॅपिड अँटीजेन चाचणी केलेल्या अनेकांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.

आजपर्यंत मृत झालेल्या १९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

तारिख  परिसर वयोगट
१७ जुलै इमली बाग
३४ वर्षीय पुरूष
१९ जुलै नया बाजार ७२ वर्षीय महिला

२० जुलै
नया बाजार ६३ वर्षीय पुरूष
२१ जुलै वारीसपुरा ५१ वर्षीय पुरूष
२२ जुलै वारीसपुरा
५४ वर्षीय महिला

२३ जुलै
पिली हवेली ६० वर्षीय पुरूष
२३ जुलै
नया बाजार

६६ वर्षीय पुरूष
२५ जुलै गोरा बाजार
५२ वर्षीय पुरूष
२६ जुलै
नया बाजार
४३ वर्षीय पुरूष
२६ जुलै कुंभारे कॉलनी ४५ वर्षीय महिला

२७ जुलै

महादुला
४४ वर्षीय पुरूष

२८ जुलै
तुमडीपुरा ३५ वर्षीय पुरूष
३० जुलै येरखेडा ६० वर्षीय महिला
३० जुलै नया बाजार
६५ वर्षीय पुरुष
३० जुलै भरतटाऊन येरखेडा ४५ वर्षीय पुरुष
१ ऑगस्ट कढोली
७० वर्षीय महिला
२ ऑगस्ट
बुनकर कॉलनी
५४ वर्षीय महिला

२ ऑगस्ट
पेरकीपुरा ६० वर्षीय पुरुष

३ ऑगस्ट
कुंभारे कॉलनी ५० वर्षीय महिला
     



 

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com