प्रश्नसंचासाठी प्राध्यापकांचीही परीक्षा

मंगेश गोमासे
Saturday, 19 September 2020

विद्यापीठाच्या १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झालेल्या आहेत. या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याचे गुण महाविद्यालयांना विद्यापीठाच्या पोर्टलवर भरावे लागणार आहे. याशिवाय इतर सेमिस्टरमध्ये बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार असून राज्य सरकारने ठरविलेल्या ५० टक्के थेअरी आणि ५० टक्के आंतरिक गुणाच्या आधारावर द्यायचे आहे.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे ‘एमसीक्यू’ पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यामुळे प्राध्यापकांना ऑनलाइन परीक्षेसाठी जवळपास प्रत्येक विषयाचे २५० वस्तुनिष्ठ प्रश्न काढायचे, त्याचे मराठीत भाषांतर करायचे, असे १५०० प्रश्न तयार करायचे आहेत. हे सर्व करीत असताना रोजची ऑनलाइन व्याख्यानेही पूर्ण करायची आहेत. सर्व कामे सांभाळून प्रश्नसंच तयार करताना प्राध्यापकांची चांगलीच दमछाक होत आहे.

विद्यापीठाच्या १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झालेल्या आहेत. या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याचे गुण महाविद्यालयांना विद्यापीठाच्या पोर्टलवर भरावे लागणार आहे. याशिवाय इतर सेमिस्टरमध्ये बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार असून राज्य सरकारने ठरविलेल्या ५० टक्के थेअरी आणि ५० टक्के आंतरिक गुणाच्या आधारावर द्यायचे आहे.

शिक्षक मतदार संघात शिक्षकांचा मतदानाचा अधिकार येणार संपुष्टात

विद्यापीठातून अंतिम वर्षाच्या १८० परीक्षेत ६३ हजार ५४० नियमित विद्यार्थी तर ७ हजार ३७९ (बॅकलॉग परीक्षा) माजी विद्यार्थी असे एकूण ७० हजार ८८३ विद्यार्थी सहभागी होतील. यासाठी १ हजार १३५ प्रश्नपत्रिका तयार करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रथमच बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात आला असल्याने प्राध्यापकांकडून प्रत्येकी ३५ प्रश्न प्रश्नपेढीसाठी तयार करण्यात येत आहे. काहींना त्यापेक्षा अधिक प्रश्न तयार करायचे आहे.

बहुपर्यायी प्रश्न काढताना ते अधिक अचूक व थेट असणे आवश्यक असते. यामुळे शिक्षकांना अधिक काळजीपूर्वक प्रश्नसंच तयार करावा लागत आहे. त्यामुळे प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळे दर्जात्मक काम कसे करायचे, अशी भावना माहविद्यालयातील प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examination of professors for question papers