esakal | गृहमंत्री म्हणाले, शेतकरी आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेणार...
sakal

बोलून बातमी शोधा

काटोलः जनता दरबारात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारणीकरिता निधी कमी पडू देणार नाही. फक्त नगर परिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगीतले.

गृहमंत्री म्हणाले, शेतकरी आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेणार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि.नागपूर)  : शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल येथील जुने फल्ली मार्केट येथे शनिवारी (ता.7) आयोजित जनता दरबार कार्यक्रमात जाहीर केले.


क्‍लिक करा  : नागपुरात पुन्हा एका सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश, बेसा भागातील या प्रसिद्‌ध मालमध्ये होता अड्‌डा...

छत्रपतींच्या पुतळयाला निध कमी जाणार नाही
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारणीकरिता निधी कमी पडू देणार नाही. फक्त नगर परिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगीतले. याप्रसंगी विविध विभागांच्या 212 तक्रारी व मागण्यांपैकी 166 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
नवीन रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत तक्रारी होत्या. त्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले. जनता दरबाराला ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला, माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, जि. प. सदस्य सलील देशमुख, जि. प. सदस्य समीर उमप, बाजार समिती सभापती तारकेश्वर (बाबा) शेळके, काटोल पं. स. सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे, संजय डांगोरे, नीलिमा ठाकरे, चंदाताई देव्हारे, निशिकांतजी नागमोते, माजी उपसभापती अनुप खराडे, गणेश चन्ने, राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. काटोल शहरात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी, अवैध दारू व गुंडागर्दी वाढत आहे. याला येत्या आठ दिवसांत निर्बंध लावण्यात येईल, असे आश्वासन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले. संचालन राजेंद्र टेकाडे यांनी केले. आभार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी मानले.

क्‍लिक करा  : आयपीएलबाबत होउ शकतो हा महत्वाचा निर्णय :क्रिकेटप्रेमींनो, नक्‍की वाचा ही बातमी


जनता दरबारातील निर्णय
जंगली पशुपासून शेतपिकांचे नुकसान होते. त्यांना पीकविमा योजनेअंतर्गत लाभ मिळावा अशी शेतकऱ्यांना मागणी केली, ही मागणी शासनाच्या विचाराधीन असल्याचे उत्तर अनिल देशमुख यांनी दिली. उड्डाणपूल काटोल ते वंडली (वाघ) येथील विद्युत पोल सरळ करण्याविषयी वारंवार तक्रारी मागील दोन महिन्यांपासून केल्या होत्या. मात्र, काल जनता दरबार असल्यामुळे विद्युत पोल सरळ करण्यात आले.

go to top