esakal | सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Father in Tension due to chronic illness of Chimukli

विदर्भ बुनियादी शाळेत शिकणाऱ्या तन्वीला दररोज तीन हजारांचे इंजेक्शन व किमो नियमित द्यावे लागत आहे. तिच्यावर नुकतीच बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व नातेवाइकांनी थोडीफार मदत केली. शिवाय, कर्जही काढावे लागले. तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले.

सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : नाव तन्वी रसिकलाल मलमकर... वय सहा वर्ष... परिवारातील एकुलती एक कन्या... खेळण्याबागडण्याचे वय... मात्र, कॅन्सरसारखा दुर्धर व जीवघेण्या आजार झाला... ही धक्कादायक बातमी ऐकूण बापाच्या पायाखालची जमीनच सरकली... इतक्या लहान वयात मुलीला कॅन्सर झाल्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रोज मृत्यूशी दोन हात करणाऱ्या मुलीला सहकार्याची गरज आहे.

तन्वी ही दिघोरी परिसरातील राऊतनगरात राहते. जानेवारी महिण्यात तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तन्वीच्या वडिलांचे मेडिकल चौकात पार्टनरशिपमध्ये दुचाकी वाहन दुरुस्तीचे छोटेसे दुकान आहे. एवढ्याशा कमाईत भागत नसल्याने ते सकाळच्या वेळेत दोन तास पेपर विकण्याचे काम करतात. कोरोनाने अडचणीत आणखीनच भर घातली. तन्वीची आई गृहिणी आहे.

हेही वाचा - प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

सहा वर्षांच्या तन्वीवर सध्या सेंट्रल बाजार रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात तिला कॅन्सरसारख्या दुर्धर व जीवघेण्या आजाराने घेरले. तिच्या उपचारावर आतापर्यंत पाच ते सात लाखांचा खर्च झाला आहे. आणखी तेवढ्याच पैशाची गरज आहे. वडिलांना हा खर्च झेपत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून मुलीला जीवनदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भ बुनियादी शाळेत शिकणाऱ्या तन्वीला दररोज तीन हजारांचे इंजेक्शन व किमो नियमित द्यावे लागत आहे. तिच्यावर नुकतीच बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व नातेवाइकांनी थोडीफार मदत केली. शिवाय, कर्जही काढावे लागले. तन्वीच्या उपचारावर आतापर्यंत सहा ते सात लाखांचा खर्च झाला. आणखी तेवढेच पैसे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे रसिकलाल म्हणाले. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पित्याची धडपड सुरू आहे.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

तन्वीच्या वडिलांचे ‘सकाळ’मार्फत आवाहन

शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. या अडचणीच्या काळात समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे भावनिक आवाहन तन्वीच्या वडिलांनी ‘सकाळ’मार्फत नागरिकांना केले आहे.

नागरिकांना आवाहन

इच्छुक दानशूर व्यक्तींना तन्वीला मदत करावयाची असेल तर त्यांनी रसिकलाल मलमकर यांच्याशी 8208999893 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. अलाहाबाद बँकेच्या हुडकेश्वर शाखेत त्यांचे खाते असून, खाते क्रमांक ५०२९२४६४८५२ तर IFSC-ALLA0213185 कोड आहे.

संपादन - नीलेश डाखोरे