esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Female employee beaten at petrol pump

पंपावरील महिला कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यापूर्वीच पैशांची मागणी केली. यावर मोहम्मद अकरमने वाहनात पेट्रात भरल्यानंतर पैसे देतो असे म्हटले. मात्र, कर्मचाऱ्याने पैसे दिल्यावरच पेट्रोल भरणार असल्याचे सांगितल्याने दोघांत वाद झाला. 

Video : 'जास्त वेळ थांबू नको, पटकन पैसे दे अन्‌ निघ लवकर', मग घडला हा प्रकार...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाले आहेत. अत्यावश्‍यक सेवा सोडली तर कुणालाही घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, नागरिक नानाविध बहाने करून घराबाहेर पडतच आहेत. यामुळे प्रशासन व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशात पेट्रोल पंपावर गेलेल्या ग्राहकाला "पेट्रोलपंपावर जास्त वेळ थांबू नको, पटकन पैसे दे आणि निघ लवकर' असे वाक्‍य महिला कर्मचाऱ्याने वापरल्याने चागलाच वाद निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या संकटाच्या काळात सर्वजण आपापल्या परीने कोरोनाशी दोन हात करीत आहेत. कोणी गरिबांना धान्य पुरवित आहेत, तर कुणी मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय करीत आहेत. कुणी उन्हातान्हात रस्त्यावर उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिसांची काळजी घेत आहेत. यात पेट्रोल पंप चालकांनीही आपला सहभाग नोंदवला आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांनी मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वजण पेट्रोल पंपावर मास्क घालूनच पेट्रोल भरायला जात आहेत. मात्र, अशाच एका पेट्रोल पंपावर मारहाण झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

क्लिक करा - बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची पकडली कॉलर... मग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादवनगरातील इंडियन ऑइलच्या पेट्रोलपंपावर मोहम्मद अकरम रेहमान शेख (42, रा. निजामुद्दीन कॉलनी, यशोधरानगर) हा पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याने दुचाकीत शंभर रुपयांचे पेट्रोल टाकण्यास पंपावरील कर्मचाऱ्याला सांगितले. पंपावरील महिला कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यापूर्वीच पैशांची मागणी केली. यावर मोहम्मद अकरमने वाहनात पेट्रात भरल्यानंतर पैसे देतो असे म्हटले. मात्र, कर्मचाऱ्याने पैसे दिल्यावरच पेट्रोल भरणार असल्याचे सांगितल्याने दोघांत वाद झाला. 

त्यानंतर दुचाकी चालकाने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली. लगेच पंपावरील दोन कर्मचारी मदतीसाठी धावत आले. त्यानंतर अकरमने काढता पाय घेतला. यानंतर यशोधरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक पोहोचले. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी दोन तासांतच आरोपीला अटक केली. 

महिला कर्मचारी बोलली बेकार शब्दात

शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतरच ग्राहकांकडून पैसे घेतले जाते. कुणीही अगोदर पैसे मागत नाही. मात्र, या महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाना अगोदर पैसे मागितले. तसेच "पेट्रोलपंपावर जास्त वेळ थांबू नको, पटकन पैसे दे आणि निघ लवकर' असे वाक्‍य वापरल्याची चर्चा आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समजते.

हेही वाचा - लॉकडाउनचा खरा फायदा झाला कॉपीबहाद्दरांना, कसे ते वाचाच...

घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

यादवनगरातील पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादात चालकाने महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरून तसेच सीसीटीव्हीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. 

go to top