sakal

बोलून बातमी शोधा

FightFight between two families on affair in Nagpur  between two families on affair in Nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानाडोंगरीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) हिचे वस्तीत राहणारा युवका प्रशांतशी सूत जुळले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेऊन चॅटिंग सुरू केली.

‘व्हॅलेंटाईन विक’ने घातला घोळ अन् दोन कुटुंबांमध्ये लाठ्या-काठ्यांनी झाला प्रचंड राडा 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः अकरावीत शिकणाऱ्या मुलीचे वस्तीत राहणाऱ्या युवकाशी सूत जुळले. दोघांची चॅटिंग सुरू होती. ती चॅटिंग मुलीच्या मोठ्या भावाने पकडली. त्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणीची समजूत घातली तर त्या युवकाला ‘बत्ती’ दिली. त्यामुळे मुलगा आणि मुलीचे कुटुंब समोरा-समोर आले. दोन्ही गटांत बाचाबाची झाली. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. पोलिसांनी तक्रारीवरून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. ही घटना एमआयडीसी परीसरात घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानाडोंगरीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) हिचे वस्तीत राहणारा युवका प्रशांतशी सूत जुळले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेऊन चॅटिंग सुरू केली. सुशांतने सुरुवातीला मैत्री करण्यासाठी तिला वॉट्सॲपवरून मॅसेज केले. तिला रोज मॅसेज करीत असल्यामुळे रियासुद्धी त्याला रिप्लाय द्यायला लागली. दोघांची मैत्री झाली. दोघांच्या भेटी-गाठी व्हायला लागल्या. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. 

हेही वाचा - ...अन् ५० कोटी मिळवा, अजित पवारांची खुली ऑफर

बहिण नेहमी-नेहमी मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याचे भावाला लक्षात आले. त्याने तिला दोन-तिनदा टोकले. तीने मैत्रिणीसोबत चॅट करीत असल्याचे थातूरमातूर उत्तर देऊन भावाचे समाधान  केले. अलीकडे बहिण मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याचे लक्षात आल्याने त्याने मोबाईल चेक केला. त्यामध्ये प्रशांतचे बरेच मॅसेज दिसले. त्याने प्रेमसंदेश पाठविल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो चिडला. 

त्यावर बहिणीने वेळ मारून नेण्यासाठी प्रियकरावर आरोप करीत स्वःताची सुटका केली. पहिल्यांदा चूक झाल्यामुळे त्याने बहिणीची कानउघडणी केली. त्यानंतर प्रशांतची भेट घेतली. त्याला दमदाटी केली. ‘पुन्हा माझ्या बहिणीच्या नादी लागल्यास चांगला धडा शिकवेल’ अशी धमकी दिली. त्यामुळे प्रशांत घाबरला. तेव्हापासून रिया आणि प्रशांतमध्ये दुरावा निर्माण झाला होता. 

हेही वाचा - भंडारा अग्निकांड : श्‍वसनाचा त्रास आणि डोळ्यातून सतत...

‘व्हॅलेंटाईन विक’ने घातला घोळ

व्हॅलेंटाईन विक’ला सुरुवात होताच प्रशांत आणि रियाचे प्रेम उफाळून आले. त्याने ‘प्रपोज डे’च्या दिवशी रियाला वॉट्सॲप मॅसेज केले. ती बाब तिच्या भावाला कळली. त्याने त्याला झापले. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पडोळे लेआऊटमध्ये तिचा भाऊ मित्रांसह बसला होता. दरम्यान प्रशांत हा चुलत भाऊ आणि मित्रांसह तेथे पोहचला. दोघांत रॉड आणि लाकडी दंड्याने हाणामारी झाली. दोन्ही गट एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी दोन्ही गटांवर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top