
छावणी नजीकच्या या नागरी वस्तीत असलेल्या एका दुकानाला ही आग लागली होती. ज्या दुकानाला आग लागली होती त्यावर असलेल्या एका दुकानात फटाक्यांचा साठा असल्याचीही माहिती मिळाली आहे.
नागपूर : नागपुरातील छावणी परिसरात असलेल्या एका नागरी वस्तीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागली. ज्या परिसरात ही आग लागली तेथे अत्यंत दाट लोकवस्ती असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागपुरातील पोलिस आयुक्त कार्यालय असलेल्या छावणी परिसरातील ही आग लागलेली नागरी वस्ती आहे. घटनास्थळावर आग विझविण्याचे बंब पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर काही क्षणातच तेथील नागरिकांनी घटनास्थळापासून दूर अंतरावर आश्रयास गेले आहे. अद्याप तरी कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची माहिती मिळालेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
ही आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले. छावणी नजीकच्या या नागरी वस्तीत असलेल्या एका दुकानाला ही आग लागली होती. ज्या दुकानाला आग लागली होती त्यावर असलेल्या एका दुकानात फटाक्यांचा साठा असल्याचीही माहिती मिळाली आहे. मात्र, वेळीच दखल घेतली गेल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्नांना यश आले आहे.