आठवत का आपली पहिली भेट कुठे झाली होती ?

first visit trend on social media
first visit trend on social media

नागपूर : लॉकडाऊनचा काळ वाढवला गेला आहे , त्यामुळे सोशल मीडियावर बराच वेळ ऑनलाईन राहणारे नेटिजन्स या काळात विविध शक्कल लढवत कधी टाईमपास तर कधी प्रबोधन तर कधी समीक्षा करण्यात व उपदेश करण्यातही गुंतले आहेत . ' आठवतं का आपली पहिली भेट कधी झाली होती . . ? ' शिर्षकाचा एक ट्रेंड सध्या फेसबुकवर जोरात चालू आहे .

यामध्ये लाईक पेक्षा कमेंट प्रति कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो आहे . लॉकडाऊनच्या काळात  प्रत्येकजण या वेळेचा विविध अंगाने वापर करीत आहेत . काहीजण वाचन , संगीत ऐकणे , जुने लेखन किंवा आपली कामे पूर्ण करणे ,  मनोरंजक कार्यक्रम पाहणे , बुद्धिबळ कॅरम  असे खेळ खेळणे असे प्रयोग करताहेत . या साऱ्यात सर्वाधिक प्राधान्य युवा व त्यापुढील मध्यम वयीन पिढी देत आहे ते सोशल मीडियाला.व्हॉटस् अॅप, फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्राम, यू ट्युब अशात घरोघरी अनेकजण गुंतले आहेत . मग त्यातही नेटिजन्स विविध ट्रेंड चालवत आहेत.

आपले नाव सुरुवातीलाच टाकून आपण मला ओळखत असालच असे म्हणून आपण पहिल्यांदा केव्हा कोठे भेटलो , त्यावेळी आपल्यात काय संवाद झाला , निमित्त कोणते होते , काही देवाण - घेवाण झाली काय , त्यावेळचा एखादा फोटो असेल तर शेअर करावा ,     माझ्याविषयी आपल्याला काय वाटते . . ? आपली प्रत्यक्ष भेट झाली नसेल तर अन्य कॉल मेसेजद्वारे किंवा अन्य कोणत्या माध्यमातून आपला परिचय झाला . . ? याची माहिती सांगण्याबाबत आवाहन आपल्या मित्रांना करणारी ही एकच पोस्ट अनेकजण आपल्या वॉलवर पोस्ट करीत आहेत . विशेष म्हणजे या प्रयोगाला प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. कदाचित आपणास हे आवडणार नाही ; पण सर्वच जण विचारताहेत म्हणून मीही विचारत आहे , असा खुलासा देखील या आवाहनात आहे . एकूणच या उपलब्ध कालावधीत लाईक पेक्षा कमेंट अधिक असणारा हा ट्रेंड आहे.

कोरोनाच्या बातम्या व पोस्ट सातत्याने वाचून पाहून येणारी काहीशी नकारात्मक किंवा निराश भावना दूर करण्यासाठी हे इंटरेस्टिंग ट्रेंड चालवले जात आहेत . आपले जुने फोटो व त्याला रोचक कमेंटबरोबरच फेसबुकवर आठवतं का आपली पहिली भेट कधी झाली . . ? असा सवालात्मक ट्रेंड सध्या खूप जोरात आहे . यामध्ये आपल्या फेसबुक मित्रांना आपल्या पहिल्या भेटीबद्दल विचारणा करत कोरोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करून जगण्याचा आनंद लुटला जात आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com