इथे दररोज उडतो, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मंगेश गोमासे
शुक्रवार, 10 जुलै 2020

जमिन वा घर आपल्या नावावर करण्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने दररोज भूमापन कार्यालयात शेकडो लोक येत असतात. यासाठी कार्यालयात पहिला दिवस चौकशीसाठी, दुसरा दिवस टोकन घेण्यासाठी, तिसरा दिवस शुल्क भरण्यासाठी व चौथा दिवस मागणी केलेली कागदपत्रे घेण्यासाठी चकरा माराव्या लागतात. महाराष्ट्र सरकारने सर्व कामे ऑनलाईन केल्याची घोषणा केली. मात्र, भूमापन कार्यालयात सर्व सावळा गोंधळ दिसून येतो. यामुळे वरिष्ठ नागरिक, महिला, अपंगत्व असलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो.

नागपूर  : शहरात दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनापासून बचावासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशात सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्वाची असताना, शहराच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या भूमापन विभागात चुकीच्या कार्यप्रणालीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जमिन वा घर आपल्या नावावर करण्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने दररोज भूमापन कार्यालयात शेकडो लोक येत असतात. यासाठी कार्यालयात पहिला दिवस चौकशीसाठी, दुसरा दिवस टोकन घेण्यासाठी, तिसरा दिवस शुल्क भरण्यासाठी व चौथा दिवस मागणी केलेली कागदपत्रे घेण्यासाठी चकरा माराव्या लागतात. महाराष्ट्र सरकारने सर्व कामे ऑनलाईन केल्याची घोषणा केली. मात्र, भूमापन कार्यालयात सर्व सावळा गोंधळ दिसून येतो. यामुळे वरिष्ठ नागरिक, महिला, अपंगत्व असलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो.

आता या विद्यापीठातही होणार कोरोना प्रयोगशाळा...

कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन सरकार करीत आहे परंतु नगर भूमापन कार्यालय क्र 1 मध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था निर्माण होताना दिसून येत नाही. शहरातील अनेक हॉटस्पॉट असलेल्या वस्त्यांमधून या भागात येणाऱ्या नागरिकांना अरुंद जागेत उभे राहावे लागते. शिवाय अत्यंत कोंदट जागेत रांगेत लागल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. शहरात गुरूवारी (ता.9) जवळपास शंभराहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या कार्यालयाकडून अशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यास कोरोना विरोधातील लढाई आपण जिंकणार कशी हा प्रश्‍न आता पडायला लागला आहे.

एसएमएसने द्यावी माहिती
शाळेतील शिक्षण आणि इतर गोष्टी ऑनलाइन करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे या कार्यालयातील कारभार ऑनलाइन करण्याची गरज आहे. सरकारने कार्यालयात ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करून फक्त कागदपत्रे घेण्यासाठी कार्यालयात "एसएमएस'द्वारे नागरिकांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक चेतना मंच तर्फे शरद भांडारकर, नाना झोडे, ऍड. योगेश शुक्‍ला यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flies here every day, The fuss of social distance