नागरिकांनो, दसऱ्याला झेंडूची फुलं घ्यायची आहेत? जरा थांबा. भाव बघून बसेल धक्का

राजेश रामपूरकर
Sunday, 25 October 2020

अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील फुलांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात फुलांची आवक फक्त ४० टक्केच झाली. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अचानक आज झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे दर वाढले. शुक्रवारी ७० ते ८० रुपये किलो असलेला झेंडू घाऊक बाजारात आज २०० ते २५० रुपये किलो तर शेवंती २०० रुपयावरून ३०० ते ३५० रुपयावर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फुले खरेदी करण्यासाठी कोरोनाच्या काळात खिसा अधिक रिता करावा लागणार आहे

नागपूर : दसऱ्याला झेंडू, शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर पिवळ्या, केशरी झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत. मात्र यंदा झेंडू आणि शेवंतीच्या फुलांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात झेंडू २०० ते २५० रुपये तर शेवंती ३०० ते ३५० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात झेंडूचे दर गगनाला भिडले आहे. 

अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील फुलांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात फुलांची आवक फक्त ४० टक्केच झाली. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अचानक आज झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे दर वाढले. शुक्रवारी ७० ते ८० रुपये किलो असलेला झेंडू घाऊक बाजारात आज २०० ते २५० रुपये किलो तर शेवंती २०० रुपयावरून ३०० ते ३५० रुपयावर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फुले खरेदी करण्यासाठी कोरोनाच्या काळात खिसा अधिक रिता करावा लागणार आहे. दसऱ्याला वाहनांनाही ही तोरणे लावून पूजा करण्यात येते. त्यामुळे या फुलाला विशेष मागणी असते. यंदा पावसामुळे वाढलेल्या दराने ग्राहकांना वाहनांना फुल वाहूनच पुजा करण्याची वेळ आलेली आहे. 

अवनी’ येणार मोठ्या पडद्यावर ! विदर्भातील वन्यजीव-मानव संघर्ष प्रथमच रूपेरी पडद्यावर

शहरात वर्धा, भंडारा, गोदिया, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील फुले विक्रीसाठी घेऊन आले आहेत. मात्र, या वर्षी झेंडूचे उत्पादन कमी असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात झेंडू ३०० ते ३५० रुपये किलोपर्यंत गेला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांसोबत शेवंती, निशीगंधा, गुलाबांच्या फुलही बाजारात असून भाव वधारलेले आहेत असे अरोमा फ्लॉवर्सचे संचालक जयंत रणनवरे यांनी सांगितले. 

सोशल डिस्टसिंगचा फज्जा 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनलॉक करीत असताना ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी बाजारात सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. या सूचनेला केराची टोपली दाखवीत आज नेताजी मार्केटमधील फुल बाजारात किरकोळ दुकानदारांनी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटल्याने सोशल डिस्टसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers are Getting Costlier as Festivals Comes